मुंबई: गेल्या २४ तासांत मुंबईत एकूण ३९२ नव्या बाधित रुग्णांचे निदान झाले असून दिवसभरात ५०२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज दिवसभरात एकूण १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या बरोबरच ज्यांवर उपचार सुरू आहेत अशा मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार ८९७ वर आली आहे. (maharashtra registered 392 new cases in a day with 502 patients recovered and 10 deaths today)

मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख ३२ हजार ७४१ जणांना करोना विषाणूची लागण झाली असून बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ७ लाख ८ हजार ७१६ इतकी आहे. या बरोबरच बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९७ टक्के इतका झाला आहे. मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून तो १ हजार १५२ दिवसांवर पोहोचला आहे. तसेच आज दिवसभरात एकूण १० जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण १५ हजार ७४९ इतक्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

मुंबईत दिवसभरात झाल्या ३० हजार ५०९ चाचण्या
मुंबईत आज दिवसभरात एकूण ३९ हजार ५०९ इतक्या करोना चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण ७८ लाख ७१ हजार ५७७ चाचण्या करण्यात आलेल्या आहेत.

मुंबई जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के इतका असून १९ जुलै ते २१ जुलै २०२१ या कालावधीत मुंबईतील कोविड वाढीचा दर ०.०६ टक्के इतका आहे.

मुंबईत सध्या सक्रिय कंटेनमेंट झोनची संख्या ५ असून सक्रिय सीलबंद इमारची ६२ आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

मुंबईतील संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती

२४ तासात बाधित रुग्ण – ३९२
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ५०२
बरे झालेले एकूण रुग्ण – ७०८७१६
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९७%
एकूण सक्रिय रुग्ण- ५८९७
दुप्पटीचा दर- ११५२ दिवस
कोविड वाढीचा दर (१५ जुलै ते २१ जुलै)- ०.०६%

क्लिक करा आणि वाचा-

ठाण्यात आढळले ७१ नवे रुग्ण
आज ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ७१ नवे करोना बाधित रुग्ण सापडले असून ५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच ठाण्यात आज दिवसभरात ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यात आतापर्यंत एकूण १ लाख ३५ हजार २२२ जणांना करोनाची लागण झाली, तर त्यांपैकी एकूण १ लाख ३२ हजार ४०९ रुग्ण बरे झाले आहेत. ठाण्यात ज्यांवर उपचार सुरू आहेत अशा सक्रिय रुग्णांची संख्या ७५४ इतकी आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here