सदरमधील परिसरात मोटारसायकलवर आलेल्या सहा जणांपैकी एकाने बेछूट केला. ही थरारक घटना गुरुवारी रात्री ९.३० वाजतादरम्यान घडली. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून, पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. सुदैवाने या गोळीबारात कोणी जखमी झाले नाही.
गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास परिसरातील एका युवकाचा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकासोबत वाद झाला. त्यानंतर युवक घरी गेला. काही वेळाने गुन्हेगारी प्रवृत्तीचा युवक पाच साथीदारांसह तीन मोटारसायकलने गोवा कॉलनी परिसरात आला. परिसरात उभ्या युवकाच्या दिशेने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकाने देशीकट्ट्यातून बेछूट गोळीबार केला. सुदैवाने युवक बचावला. त्यानंतर गोळीबार करणारे मोटारसायकलने पसार झाले.
क्लिक करा आणि वाचा-
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विनीता शाहू, सदर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष बकाल यांच्यासह पोलिसांचा ताफा गोवा कॉलनीत पोहोचला. पोलिसांनी या ठिकाणाहून रिकामे काडतुसे जप्त केले. पोलिस गोळीबार करणाऱ्याचा शोध घेत आहेत. वृत्त लिहिपर्यंत गोळीबार करणाऱ्यांची नावे कळू शकली नाहीत.
क्लिक करा आणि वाचा-
टोळीयुद्धातून ही घटना घडली नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र हा टोळीयुद्धाचा प्रकार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times