महाड: रायगड जिल्ह्यातील माणगाव, परिसराला अतिवृष्टीचा तडाखा बसल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते तातडीने रात्री उशिरा माणगावमध्ये दाखल झाले. त्यांच्यासोबत माजी मंत्री व आमदार , आमदार निरंजन डावखरे हे आहेत. भर पावसात प्रवास करत दरेकर हे जवळील तासगाव टोल नाक्यापर्यत कसेबसे पोहचले परंतु, पुढे रस्त्यावर जवळ जवळ सहा फूट पाणी असल्याने त्यांना थांबावे लागले आहे. पुढील मार्ग बंद करण्यात आले असून तिथपर्यंत एनडीआरएफची रेस्क्यू टीमही पोहचली आहे. त्यांच्यासोबत दरेकर यांनी चर्चा करून येथील पूरपरिस्थितीची व बचावकार्याची माहीती घेतली. ( Konkan Flood )

वाचा:

प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, बचाव दल आमच्यासोबत असून त्यांनी आम्हाला पुढे जाण्यास अटकाव केला आहे. सकाळपर्यंत पाणी ओसरल्यानंतर एनडीआरएफची टीम बोटीने पुढील प्रवास करणार आहे. आम्ही सुद्धा एनडीआरएफ टीम सोबत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. येथे भीषण परिस्थिती निर्माण झाली असून संपूर्ण महाड व अन्य परिसर जलमय झाला आहे. यामुळे येथील नागरिकांना प्रचंड हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. अतिवृष्टीमुळे माणगाव, महाड येथील नागरिक भयभीत झाले असून अनेक नागरिक आपला जीव वाचविण्यासाठी एसटीच्या टपावर बसले आहेत. महाडमधील तळा येथील गावातही दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या संकटाच्या स्थितीत आम्ही त्यांच्यासोबत असल्याचे दरेकर यांनी नागरिकांना सांगितले.

वाचा:

एनडीआरएफ, नौदलाचे मदतकार्य

– रायगडमधील महाड व रत्नागिरीतील चिपळूणमध्ये आलेल्या पुरात १० हजारांहून अधिक नागरिक अडकून पडले आहेत.
– नागरिकांच्या बचावासाठी स्थानिक प्रशासनाच्या विनंतीनुसार संरक्षण दलांनी बचावकार्य सुरू केले आहे.
– भारतीय नौदलाची रेस्क्यू टीम चिपळूणसाठी रवाना. नौदलाच्या पाच तुकड्यांचा समावेश.
– नौदलाच्या प्रत्येक तुकडीत आठ जवान व एक रबरी बोट आणि एक मोटर इंजिन. शुक्रवारी सकाळी बचावकार्य सुरू होणार.
– एनडीआरएफची एक तुकडी मुंबईहून तर पुण्याहून दोन तुकड्या चिपळुणात दाखल. एकूण १३५ जवानांचा समावेश
– तटरक्षक दलाची एक तुकडी मुरूडहून पोहोचली. एकूण १५ जवानांचा समावेश.
– बचावकार्यासाठी अद्याप हेलिकॉप्टरचा वापर करण्याचा निर्णय झालेला नाही.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here