वॉशिंग्टनः अॅमेझॉन, झोमॅटो आणि पेटीएमसह जगभरातील २९ हजार वेबसाइट गुरुवारी काही कालावाधीसाठी ठप्प झाल्या होत्या. या कंपन्यांच्या वेबसाटइ काम करत नव्हत्या किंवा त्यांचा वेग मंदावला होता. यात अनेक एअरलाइन्स, बँक आणि टेक कंपन्यांचाही समावेश आहे. याशिवाय सोनी लिव, हॉटस्टारसारख्या ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मचे अॅपही अचानक गुरुवारी संध्याकाळी डाउन झाले होते.

आउटेज ट्रॅकींग वेबसाइट डाउनडिटेक्टरनुसार डोमेन नेम सिस्टीम (DNS)मध्ये बिघाड झाल्यामुळे या वेबसाइट काही कालावधीसाठी ठप्प झाल्या होत्या. पण आता या वेबसाइट सुरळीतपणे काम करत आहेत. आउटेजमुळे या कंपन्यांच्या वेबसाइट लोड घेत नव्हत्या. सिस्टीम डोमेन नेम सिस्टीम सर्व्हिसमध्ये एररची माहिती दिली जात होती.

क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी अकामाई टेक्नॉलॉजीजने (AKAM.O) यासंदर्भात माहिती दिली. DNS सर्व्हिसमध्ये काही अडचणी आहेत. याची तपासणी केली जात आहे, असं अकामाई टेक्नॉलॉजीजकडून सांगण्यात आलं.

अमेरिकेच्या कंपन्यांवर परिणाम

DNS काम करत नसल्याने अेरिकेतील बड्या कंपन्यांवर त्याचा मोठा परिणाम झाला. यात डेल्टा एअर लाइन्स (DAL.N), कॉस्टको होलसेल कॉर्प (COST.O) आणि अमेरिकन एक्स्प्रेससह (AXP.N) अनेक एअरलाइन्स , बँकिंग आणि आयटी कंपन्यांचा समावेश आहे.

दोन महिन्यांत तिसरी घटना

जूनमध्ये जगभरात सोशल मीडिया, सरकारं आणि न्यूज वेबसाइटवर आउटेज हिट झाले होते. केवळ २ महिन्यांच्या काळात वेबसाइट ठप्प होण्याची ही तिसरी घटना आहे. अमेरिकेच्या क्लाउड कंम्प्युटिंग कंपन्यांच्या सर्व्हिसमध्ये बिघाड झाल्याने DNS सिस्टीम काम करत नव्हतं. यामुळे जगभरातील २९ हजार कंपन्यांच्या वेबसाइट ठप्प झाल्या होत्या, असं सांगण्यात येतंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here