नवी दिल्लीः कोकणात रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. यावरून केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे ( ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ( ) गंभीर टीका केली आहे. राज्य सरकारला कुठलंही गांभीर्य नसल्याचा आरोप राणेंनी केला आहे. नागरिकांना तातडीने हेलिकॉप्टर आणि बोटींनी बाहेर काढून त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था केली जायला हवी, असं राणे म्हणाले. मदत आणि बचावकार्यासाठी केंद्र सरकारची टीम पाठवण्यात येईल. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांशी यासंदर्भात माझं बोलणं झालं आहे. तसंच नागरिकांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्याशीही आपण बोललो आहोत, असं राणेंनी सांगितलं.

राज्य सरकारला कुठलंही गांभीर्य नाही. पाऊस सुरू झाला आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तयारी करायला हवी आहे. आषाढी एकादशीला पंढपूरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वतः गाडी चालवत गेले. पण त्यांना माणुसकी तरी आहे का? चेंबूर आणि भांडुपमध्ये अतिवृष्टीने घरं कोसळल्याने काही नागरिकांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांचं साधं सांत्वन करायला ते गेले नाहीत. भेटही दिली नाही, अशी टीका राणेंनी केली.

विठ्ठलच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री गाडी चालवत गेले. राज्याला ड्रायव्हर नकोय. जनतेचं हित जपणारा चांगला मुख्यमंत्री राज्याला हवा आहे. गाडी चालवणारे हजारो ड्रायव्हर महाराष्ट्र शासनाकडे आहेत. त्यात काय कौतुक गाडी चालवण्याचं? मग मंत्रालयात जायचं गाडी चालवत. मंत्रिमंडळ बैठकीला जायचं. पण गाडी चालवत ते मंत्रालयात आणि मंत्रिमंडळ बैठकीलाही जात नाहीत. यात काय भूषण आहे? काय कर्तृत्व आहे. जनतेचा जीव धोक्यात असताना त्यांना वाचवायचं दिलं सोडून आणि ज्यांच्या घरातील माणसं गेली त्यांचं सांत्वन करायचं दिलं सोडून हे गाडी चालवत निघाले, असा टोला नारायण राणेंनी लगावला आहे.

राज्यात अतिशय गंभीर परिस्थिती आहे. विकास ठप्प आहे. पण आता कोकणात जी नैसर्गिक आपत्ती आली आहे, यासंदर्भात आपण केंद्र सरकारकडे बोललो आहे, असं राणेंनी सांगितलं. पूरस्थितीबाबत सर्वकाही मदतची व्यवस्था पाहू, असं केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांनी आश्वासन दिल्याचं राणे म्हणाले. जी लोकं पुराच्या पाण्यात अडकून पडली आहेत, त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. राज्याला मदतीची गरज आहे, असं राणेंनी स्पष्ट केलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here