मुंबई – राज्यात मुसळधार पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये. सततच्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांना पूर आला असून काही गावांचा संपर्क तुटला आहे. चिपळूणमध्ये पुरामुळे लोकांचे हाल झाले आहेत. इथे मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू असून शेकडो लोक अजूनही पाण्यात अडकले आहेत.

– कोयना धरणाचे ६ दरवाजे उघडल्याने चिपळुणला पुन्हा पुराचा धोका

-सांगलीमध्ये कृष्णा नदीला पुराचं स्वरुप

– कोयना धरणाच्या पाण्यामुळे सांगलीमध्ये धोका वाढला

– कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, नजिकच्या गावांना सतर्कतेचा इशारा

– महाड शहराला पुराच्या पाण्याचा वेढा, अडकलेल्या नागरिकांसाठी मदतकार्य सुरू, NDRF, SDRF कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू, वीजपुरवठा खंडित, मोबाईलला नेटवर्क नाही

– नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

– कोयना धरणाचे दरवाजे उघडले

– पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी, अनेक गावांचा संपर्क तुटला

– पाऊस ओसरला असला तरी पाण्याचा निचरा संथगतीने

– चिपळूणमध्ये महापूराने जनजीवन विस्कळीत, शेकडो लोक अजूनही पुराच्या पाण्यात

– महाडमधून नागरिकांना स्थलांतर करून लोणावळा इथे नेणार

– एनटीआरएफची टीम, प्रविण दरेकर आणि गिरीश महाजन मानगावमध्ये

– महाडमध्ये पुराचा वेढा, NDRF ची टीम मानगावमध्ये दाखल

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here