या बरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील धामणंदमध्ये तब्बल १७ घरांवर दरड कोसळली आहे. यात अनेक लोक अडकले आहेत. तसेच, खेड तालुक्यातील बिरमई येथे देखील दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. येथील बचावकार्यासाठी लष्करी पथकांना देखील पाचारण करण्यात आले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
चिपळूणमध्ये मुसळधार पावसाने कहर केला असून येथील लोकांना महापुराचा सामना करावा लागत आहे. चिपळूणमधील पुरात अडकलेल्या तब्बल १ हजार ८०० लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. चिपळूणची परिस्थिती पाहता लष्कर आणि नौदलांची ४ पथके चिपळूणला पोहोचत असल्याची माहिती शासकीय अधिकाऱ्यांनी दिली. या बरोबरच चिपळूणमध्ये हवाईदलाचे ३ हेलिकॉप्टर बचावकार्य करत असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. चिपळूणमध्ये एनडीआरएफची ४ पथकेही बचावकार्य करत आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
महाडमधील तळीये गावात मृतांचा आकडा वाढण्याची भीती
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात तळीये गावात दरड कोसळून आतापर्यंत ३८ जणांचा जीव गेला आहे. मुसळधार पावसामुळे तळीये गावातील एकूण ३५ घरांवर दरड कोसळली. आताही येथे ढिगाऱ्याखाली ८० ते ८५ लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
क्लिक करा आणि वाचा-
येथे दुर्घटना घडल्यानंतर १९ तास कोणतीही मदत पोहोचू शकली नाही. तोपर्यंत स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू करत ३० मृतदेह बाहेर काढले होते. दरम्यान, तळीये येथे आज दुपारी एनडीआरएफचे पथक पोहोचले आहे.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times