सैबेरियाच्या बर्फाच्छादित भूमीमध्ये तब्बल ४६,००० वर्षांपूर्वीच्या गोठलेल्या अवस्थेत आढळले आहेत. हा पक्षी ” असल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले असून या अवशेषांमुळे हिमयुगाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये हा प्रदेश कसा बदलत गेला, हे समजून घेण्यास मदत होणार आहे.
‘कम्युनिकेशन्स बायोलॉजी’ या नियतकालिकामध्ये याविषयीचा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. हिमयुगामध्ये उत्तर युरोप आणि आशियाभर पसरलेला विस्तीर्ण गवताळ प्रदेश हा आज नामशेष झालेल्या पशुपक्ष्यांच्या अनेक प्रजातींचे निवासस्थान होता. हिमयुगाच्या अखेरीस हा प्रदेश विविध भागांमध्ये विभागला गेला व आज यापैकी उत्तरेकडील भाग टुंड्रा, मध्यभाग तैगा आणि दक्षिणेकडील भाग गवताळ प्रदेश म्हणून ओळखला जातो. ज्या प्राचीन पक्ष्याचे अवशेष सापडले आहेत, त्याच्या दोन उपप्रजाती आज अस्तित्त्वात असल्याचेही अनुवांशिक विश्लेषणाद्वारे सिद्ध झाले आहे. यापैकी एक प्रजाती सैबेरियामध्ये, तर दुसरी प्रजाती मंगोलियामध्ये आढळते, असे या स्टॉकहोम युनिव्हर्सिटीच्या प्राणीशास्त्र विभागाचे संशोधक आणि या अभ्यासाचे सहलेखक निकोलस डसेक्स यांनी सांगितले. या अभ्यासामुळे पक्ष्यांच्या उपप्रजातींमधील विविधता कशी उत्क्रांत होत गेली हे समजण्यास मदत होईल, असेही डसेक्स यांनी सांगितले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times