महाड तालुक्यातील तळीये या गावात संध्याकाळी ४च्या सुमारास दरड कोसळल्यामुळे गावातील घरे दरडीखाली दबली गेली. आज दरडी खालून ३६ मृतदेह काढण्यात आले आहेत तर सुमारे ४० जण दरडीखाली अडकले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. महाड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच महाबळेश्वर व वरंधा घाट डोंगर भागातील पावसाच्या पाण्याचा लोंढा महाड तालुक्यात आल्याने महाड शहरासह परिसरातील गावांमध्ये पूर आला, अशी माहिती समजते.

गुरुवारी रात्री झालेली अतिवृष्टी व महाबळेश्वर डोंगरमाथ्यावरून आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे महाड तालुक्यातील तळीये तर पोलादपूर तालुक्यातील केवनाळे व गोवले सुतारवाडी येथे दरडी कोसळून सुमारे ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. तळीये येथे दरडीखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

रायगडवर दरडींचे संकट; कालची रात्र ठरली काळरात्र; मन सून्न करणारे दृश्य

महाड तालुक्यातील तळीये या गावात संध्याकाळी ४च्या सुमारास दरड कोसळल्यामुळे गावातील घरे दरडीखाली दबली गेली. आज दरडी खालून ३६ मृतदेह काढण्यात आले आहेत तर सुमारे ४० जण दरडीखाली अडकले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. महाड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच महाबळेश्वर व वरंधा घाट डोंगर भागातील पावसाच्या पाण्याचा लोंढा महाड तालुक्यात आल्याने महाड शहरासह परिसरातील गावांमध्ये पूर आला, अशी माहिती समजते.

पावसाचं थैमान
पावसाचं थैमान

राज्याच्या विविध भागांत बुधवारी रात्रभर आणि गुरुवारी दिवसभर पावसाची कोसळधार अनुभवायला मिळाली. त्यामुळे कोकणातील रायगड, चिपळूणला सर्वाधिक फटका बसला आहे. रायगड जिल्ह्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसानं दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

डोंगरकपारीत वसलेले गाव
डोंगरकपारीत वसलेले गाव

तळीये हे गाव डोंगरकपारीत वसलेले आणि टप्प्याटप्प्याने घरे असल्याने गावातील घरे दराडीच्या खाली दबली गेली. तळीये या गाव सुमारे पस्तीस घरे आहेत. अतिवृष्टीमुळे या भागातील वीज पुरवठा बंद होता तर पुराचे पाणी सर्वत्र पसरल्याने गावापर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्याचा माग काढणे देखील अवघड होते. यामुळे या भागात तातडीने बचाव पथक वा मदत पोहोचू शकली नाही.

कच्ची बांधकामाची घरे
कच्ची बांधकामाची घरे

तळीये गावातील एक दोन घरे सोडली तर उर्वरित घरे साधी कच्ची बांधकामाची आहेत. सामान्य मजूर व शेतकऱ्यांची वस्ती असलेल्या या गावातील निष्पाप जीवाचा अतिवृष्टीने बळी घेतला असून कालपर्यंत अस्तित्वात असलेले हे गाव एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. गावापर्यंत बिरवाडी,राजेवाडी व खरवली या तीन मार्गाने जाता येत होते. मात्र अतिवृष्टीमुळे पूर स्थिती असल्याने तिन्ही मार्ग बंद असल्याने गावकऱ्यांची सुटका करणे कठीण झाले होते. पुराचे पाणी ओसरल्यानंतर एनडीआरएफ व इतर बचाव पथके गावापर्यंत पोहोचली.

पोलादपूर येथेही दरड कोसळली
पोलादपूर येथेही दरड कोसळली

तळीयेबरोबर पोलादपूरमध्येही दरड कोसळली आहे. पोलादपूर तालुक्यातील गोवेले ग्रामपंचायत हद्दीमधील सुतारवाडी येथे गुरुवारी (२२ जुलै) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. यावेळी कोसळलेल्या दरडीखाली सुमारे आठ ते दहा घरांचे नुकसान झाले असून आणखी काही घरे दरडीसोबत उतारावर वाहून गेली आहेत. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री ही घटना कळल्यानंतर प्रशासनाने तसेच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचण्यासाठी आढावा घेतला. त्यावेळी कापडे ते कामथे बोरघर रस्त्यावरील कापडे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरील खांबेश्वरवाडीला जोडणारा पूल अर्धा मधोमध तुटून वाहून गेला होता. तर, साखर बोरज येथील पुलदेखील तुटून वाहून गेल्याने गोवेले गावाकडे कोणत्याही प्रकारचे मदतकार्य पोहोचविणे प्रशासनास शक्य झाले नव्हते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here