गेल्या ४ दिवसांपासुन कोकणात पावसाने धुमाकुळ घातला आहे. अनेक भागात पूर आला आहे. चिपळुणातील कोविड सेंटर असलेल्या अपरांत हॉस्पीटलमध्येही काल संध्याकाळी पाण्याचा मोठा लोट आला त्यामुळे संपुर्ण कोविड सेंटरमध्ये पाणी चिखल झाल्यानं मोठी खळबळ उडाली. यावेळी स्थानिक तरुणांनी जिवाची बाजी लावत रुग्णांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. कंबरेपर्यंत पाणी व अंधार यामुळं या तरुणांचे प्रयत्न तोकडे पडले.
वाचाः
रुग्णालयात ऑक्सीजनचा पुरेसा साठा होता. एकूण ३० सिलेंडर रुग्णालयात उपलब्ध होते. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळं दुर्दैवानं या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनानं एक चिपळूणमध्ये झालेल्या नुकसानीचे एक पत्रक जारी केले आहे. त्यानुसार अपरांत रुग्णालयात ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात २१ रूग्ण होते. त्यापैकी काही रुग्ण व्हेंटिलेटरवर होते.
वाचाः
दरम्यान, चिपळूण तालुक्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु असून आता हळूहळू पाणी ओसरत असल्याने मदतकार्याला वेग आला आहे.अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. एनडीआरएफची २ पथके, आर्मीचे १ पथक, नौदलाची २ पथके, हवाईदलाचे ०२ पथके तसेच १५ स्वयंसेवी संस्थांमार्फत बोंटीद्वारे मदत कार्य सुरु आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरु असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. सर्वांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
वाचाः
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times