नवी दिल्ली : काश्मीरचे नेते , आणि या लवकरात लवकर सुटावेत यासाठी पार्थना करतो, असं वक्तव्य भारताचे यांनी केलंय. जम्मू-काश्मीरचे हे तीनही माजी मुख्यमंत्री सुटकेनंतर काश्मीरची परिस्थिती सामान्य होण्यासाठी मदत करतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केलीय.

‘काश्मीरमध्ये सध्या शांततेचं वातावरण आहे. परिस्थिती तेजीनं सुधारतेय. सुधारणेसहीत नेत्यांच्या सुटकेचा निर्णयही लवकरच घेतला जाईल. सरकारनंही कुणाचाही विश्वासघात केलेला नाही’ असं म्हणत राजनाथ सिंह यांनी सरकारच्या निर्णयाला पाठिंबाही व्यक्त केला. काश्मीरच्या हितासाठी काही निर्णय घेण्यात आलेत, त्यांचं स्वागत व्हायला हवं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

उल्लेखनीय म्हणजे, ५ ऑगस्ट २०१९ पासून काश्मीरचे हे तीनही नेते नजरकैदेत आहेत. फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांच्यासहीत शाह फैजल, सरताज मदानी, हिलाल लोन, अली मोहम्मद सागर आणि नईम अख्तर यांच्यावरही सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत (Public Security Act – PSA) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आलीय.

५ ऑगस्ट रोजी संसदेत जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द करण्यारं विधेयक संमत करण्यात आलं होतं. यानंतर जम्मू-काश्मीरला जम्मू-काश्मीर आणि लडाख दोन वेगवेगळ्या केंद्रशासित प्रदेशांत विभागण्यात आलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here