टोकियो : बहुप्रतिक्षीत टोकियो ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा कोरोनाचे सर्व नियम पाळत धुमधडाक्यात पार पडला. कोरोनामुळे एक वर्ष पुढे ढकलण्यात आलेली ही स्पर्धा पार पडणार की नाही, तसेच स्थानिक लोकांचा विरोध होत असल्यानेही स्पर्धेबाबत संभ्रम व्यक्त केला जात होता, पण अखेर क्रीडा स्पर्धांच्या महाकुंभाचा प्रारंभ झाला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आशेचा किरण घेऊन सुरू झालेल्या या स्पर्धेत 206 देशातील अकरा हजार खेळाडू सहभागी झाले आहेत. एकीकडे उद्घाटन सोहळ्याचा आनंद साजरा केला जात असताना दुसरीकडे पाकिस्तान, ताजिकिस्तान आणि किर्गिस्तानने मात्र ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याला गालबोट लावले आहे.

वाचा-

टोकियो ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यावेळी पाकिस्तान, ताजिकिस्तान आणि किर्गिस्तानच्या ध्वजवाहक तसेच शिष्टमंडळांनी मास्क न घालता प्रवेश केला. पाकिस्तानच्या ध्वजवाहकांनी, ताजिकिस्तान आणि किर्गिस्तानच्या शिष्टमंडळातील अनेकांनी मास्क घातले नव्हते. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयोजकांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत, पण उद्घाटन सोहळ्यापासूनच खेळाडू आणि अधिकाऱ्यांनी नियमभंग करण्यास सुरवात केली आहे.

वाचा-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याच्या सूचना आयोजकांकडून देण्यात आल्या आहेत. पण तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आतापर्यंत 110 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती शुक्रवारीच संयोजन समितीने दिली होती.

वाचा-

कोरोनाचे निदान झालेल्यांपैकी हरुमी जिल्ह्यातील ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणाऱ्या गावातील तिघांचा समावेश आहे. ऑलिम्पिकशी संबंधित व्यक्तींचे कोरोना निदान करण्यास 1 जुलैपासून सुरूवात करण्यात आली होती. ऑलिम्पिक स्पर्धा भरविण्यासाठी कटिबद्ध असलेले जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा यांनी टोकियोमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे, पण दररोज कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे.

वाचा-

उद्घाटन सोहळ्याच्या आदल्या दिवशी टोकियोमध्ये कोरोनाचे 1979 नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसातील ही आतापर्यंतची सर्वाधिक नोंद ठरली आहे. याआधी 15 जानेवारीला 2044 रुग्ण सापडले होते. जपानमध्ये आतापर्यंत 8 लाख 53 हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून 15 हजार 100 जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष गोष्ट म्हणजे लोकसंख्येच्या मानाने जपानमध्ये इतर देशांपेक्षा रुग्ण आणि मृतांची संख्या खूप कमी आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here