मुंबई : कमॉडिटी बाजारात आणि चांदीमधील घसरण कायम आहे. आज शुक्रवारी सोन्याचा भाव २५० रुपयांनी कमी झाला. तर चांदीमध्ये ४०० रुपयांची घसरण झाली. सोने विक्रमी पातळीच्या तुलनेत जवळपास ८५०० रुपयांनी स्वस्त आहे.

सध्या एमसीएक्सवर सोन्याचा भाव ४७७६० रुपये आहे. त्यात ११० रुपयांची घसरण झाली आहे. तत्पूर्वी सोन्याचा भाव ४७३०० रुपयांपर्यंत खाली आला होता. त्यात २५० रुपयांची घसरण झाली होती.

एमसीएक्सवर एक किलो ६७१२१ रुपये इतका खाली आला आहे. त्यात सध्या २६० रुपयांची घसरण झाली आहे. तत्पूर्वी चांदीचा भाव ६६६६७ रुपयांची नीचांकी पातळी गाठली होती. याआधी ‘एमसीएक्स’वर गुरुवारी सोने आणि चांदीमध्ये घसरण झाली होती. सोन्याचा भाव १२० रुपयांची घसरण झाली होती.चांदीमध्ये २०० रुपयांची घसरण झाली होती.

Goodreturns या वेबसाईटनुसार आज शुक्रवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६८७० इतका खाली आला आहे तर २४ कॅरेटचा भाव ४७८७० रुपये इतका आहे. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६८५० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५१११० रुपये झाला आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४५०६० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९१६० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७२५० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९९५० रुपये आहे.

जागतिक पातळीवर मात्र सोने दरात किंचित घसरण आहे. स्पॉट गोल्डचे दर ०.४ टक्क्यांनी घसरले व १८०३ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. जागतिक गुंतवणूकदारांमध्ये जोखिमीची भूक वाढल्याने स्पॉट गोल्डचे दर मागील आठवड्यात निचांकी स्थानावरच खिळून राहिले. त्यामुळे सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याचे आकर्षण कमी झाले. डेल्टा व्हेरिएंट कोव्हिड-१९ संक्रमितांमध्ये वाढ झाल्याने जागतिक गुंतवणूकदार सावध झाले आहेत. अनेक देशांत लॉकडाऊन वाढण्याची चर्चा आहे. त्यामुळे आर्थिक सुधारणा लांबवणीवर पडेल, या विचाराने बाजार भावनांवर परिणाम झाला. दरम्यान, मागील आठवड्यात विक्री अनुभवल्यानंतर कालच्या सत्रात जागतिक इक्विटी बाजार आणि बाँड रिटर्नमध्ये सुधारणा दिसून आली. त्यामुळेही गुंतवणूकदार सोन्यापासून दूर राहिले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here