मुंबई: मागील दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळं राज्यात पश्चिम महाराष्ट्र व कोकणात पूर आला आहे. गावेच्या गावे पाण्याखाली गेली असून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळं सुमारे ६० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारनं संपूर्ण यंत्रणा बचावकार्याला जुंपली असून स्वयंसेवी संस्था देखील मदकार्यात उतरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. ( appeal workers amid flood situation in Maharashtra)

राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मनसैनिकांना आवाहन केलं आहे. ‘महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं थैमान घातलं आहे. त्यातही कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थिती भीषण आहे. ह्या अवघड परिस्थितीत मनसैनिकांनी पूरग्रस्तांना जमेल तितकी मदत करावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

वाचा:

‘आता लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. पूर जसजसा ओसरेल तसा रोगराईचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं संपूर्ण परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवा. योग्य त्या ठिकाणी आवश्यक ती मदत तातडीनं पोहोचेल याची काळजी घ्या. स्वत:चीही काळजी घ्या, पण महाराष्ट्रावरचं हे संकट मोठं आहे. त्याला तोंड देताना आपल्याकडून कुठलीही कुचराई होता कामा नये,’ असंही राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना बजावलं आहे.

मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

पुराच्या तडाख्यानंतर मदत व बचावकार्याला वेग आला आहे. वेगवेगळ्या अडथळ्यांमुळं काल पूरग्रस्त भागांत पोहोचू न शकलेली एनडीआरएफची व अन्य मदत पथके ठिकठिकाणी पोहोचली आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून असून जिल्हा प्रशासनाला मार्गदर्शन करत आहेत. दरम्यान, केंद्र सरकारशीही संवाद सुरू असून परिस्थितीची माहिती वेळोवेळी दिली जात आहे. दरडी कोसळून मरण पावलेल्यांच्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here