वाचा:
महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराजांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यात सामाजिक व राजकीय वातावरणं तापलं आहे. इंदोरीकरांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी काही सामाजिक संघटना करत आहेत. तृप्ती देसाई यांची संघटनाही यात आघाडीवर आहे. इंदोरीकरांवर कायदेशीर कारवाई न झाल्यास त्यांना अकोलेमध्ये जाऊन काळं फासू, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यावरून मोठा गदारोळ झाला होता.
भोर महाराजांनी तृप्ती देसाईंना घरी फोन करून धमकी दिली होती. शिवीगाळ केली होती. अकोलेत येऊन दाखव, तुला कापूनच टाकतो, असं भोर महाराज म्हणाल्याचा आरोप देसाईंनी केला होता. पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यात त्यांनी ई-मेलद्वारे तशी तक्रार केली होती. त्यानंतर आता भोर महाराजांनी या वादावर पडदा टाकला आहे. त्यांनी देसाईंची माफी मागितली आहे. ‘देसाईंना मी जे काही बोललो, त्याचा इंदोरीकरांशी संबंध नाही. राग अनावर झाल्यानं मी बोललो. त्याबदद्ल माफी मागतो, असं त्यांनी म्हटलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times