अहमदनगर: आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी वादात सापडलेले कीर्तनकार निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराजांना पाठिंबा म्हणून तालुक्यात आज बंद पुकारण्यात आला आहे. इंदोरीकरांना काळं फासण्याची भाषा करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या यांचा निषेध म्हणून बंद पुकारण्यात आला आहे. निषेध सभा, भजन व दिंडीच्या माध्यमातून लोक इंदोरीकरांना पाठिंबा व्यक्त करणार आहेत.

लाइव्ह अपडेट्स:

>> मोटारसायकल रॅली काढून तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन दिले जाणार

>> भजन आणि दिंडीच्या माध्यमातून इंदोरीकरांना व्यक्त होतोय पाठिंबा

>> अकोलेकर ग्रामस्थ टाळ, मृदंग घेऊन उतरले रस्त्यावर

>> तृप्ती देसाईंसारख्या विकृत मानसिकतेच्या व्यक्तीला धडा शिकवण्याची अकोलेकरांची मागणी

>> अकोले शहरातील बाजारपेठा, दुकानं सकाळपासूनच बंद

>> इंदोरीकरांवर गुन्हा दाखल न झाल्यास काळं फासण्याचा दिला होता इशारा, याचाच निषेध म्हणून अकोलेकर रस्त्यावर उतरलेत

>> ‘भूमाता ब्रिगेड’च्या तृप्ती देसाई यांनी इंदोरीकरांवर गुन्हा दाखल करण्याची केली होती मागणी

>> इंदोरीकर महाराजांनी एका कीर्तनात मुलगा-मुलगीच्या जन्माबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यापासून सुरू आहे वाद

>> इंदोरीकरांना काळं फासण्याची भाषा करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांचा निषेध म्हणून होतोय बंद

>> महाराजांच्या समर्थनार्थ बंदमध्ये सहभागी होण्यासाठी गावागावांतील ग्रामपंचायतीचे ठराव

>> इंदोरीकर महाराजांच्या पाठिंब्यासाठी अकोले तालुक्यात आज बंद

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here