नवी दिल्लीः देशात करोनाची तिसरी लाट कशामुळे येणार? याची ( ) संभाव्य कारणं सरकारने संसदेत सांगितली. केंद्रीय आरोग्यमंत्री यांनी ( ) लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर दिलं. व्हायरसमधील म्युटेशमुळे (बदल) किंवा अतिसंवेदशनशील लोकसंख्येच्या संपर्कात येण्याने करोनाची तिसरी लाट येऊ शकते. या व्यतिरिक्त ते कोरोना व्यवस्थापनाशी संबंधित अनेक औषधी आणि इतर घटकांवर देखील अवलंबून असेल, असं मांडवीय यांनी सांगितलं.

लसीकरणामुळे संसर्गाची तीव्रता टाळता येते आणि कळप रोग प्रतिकारशक्तीलाही मदत होईल. लस फक्त संसर्गापासूनच सुरक्षा देत नाही तर आजाराची तीव्रता, हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे आणि मृत्युचे प्रमाणही कमी करते, असं त्यांनी स्पष्ट केलं.

तिसरी लाट आणि करोनाच्या डेल्टा वेरियंटचा परिणाम मुलांवर होईल, असा इशारा काही तज्ज्ञांनी दिला आहे. यावरही मांडवीय यांनी स्पष्टीकरण दिलं. मुलांमध्ये करोनाने आजार हा तीव्र होण्याचे जगात अद्याप कुठलेही पुरावे नाहीत. तसंच डेल्टा वेरियंटच्या रुग्णांमध्ये हेच दिसून येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

करोनाविरोधी लढाईत सकार १८ वर्षांवरील अधिक वयाच्या नागरिकांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. विरोधकांनी यावरून राजकारण करू नये. यावरून राजकारण करण्याऐवजी मिळून काम करण्याची गरज आहे. अफवा पसरवणाऱ्यांना उत्तर दिलं पाहिजे, असं आवाहन मनसुख मांडवीय यांनी विरोधकांना केलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here