नवी दिल्ली : रोहित शर्माने २०१७ साली जेव्हा पहिल्यांदा भारताचे कर्णधारपद स्विकारले होते, तेव्हा त्याने एक विक्रम रचला होता. तो विक्रम अजूनही अबाधित आहे. कारण रोहितसारखी कामगिरी आतापर्यंत शिखर धवन, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, सौरव गांगुली यांनाही जमलेली नाही.

रोहितच्या नावावर नेमका कोणता असा विक्रम आहे, पाहा…शिखर धवनने ज आजचा सामना जिंकला असता तर त्याला रोहितच्या विक्रमाच्या जवळ जाता आले असते. पण धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आज पराभव पत्करावा लागला आणि त्याला रोहितच्या विक्रमाच्या जवळही जाता आले नाही. रोहित शर्माने जेव्हा २०१७ साली पहिल्यांदा भारताने नेतृत्व सांभाळले होते तेव्हा तो पहिले तिन्ही सामने श्रीलंकेविरुद्धच खेळता होता. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने तिन्ही सामन्यांमध्ये श्रीलंकेला पराभूत केले होते. त्यानंतर २०१८ साली दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत सलग चौथा विजयही साकारला होता. पण ही गोष्ट धवन, कोहली, धोनी आणि गांगली यांना जमलेली नाही. कारण धवन सलग दोन सामने जिंकला होता आणि तिसऱ्या सामन्यात त्याला पराभव पत्करावा लागला.

धोनीने नेतृत्व स्विकारल्यावर त्याला पहिल्याच मालिकेत २-४ असा पराभव पत्करावा लागला होता. त्याचबरोबर धोनीला पहिल्या तिन्ही सामन्यांत एकही विजय मिळवता आला नव्हता. कोहलीने २०१३ साली भारताचे पहिल्यांदा नेतृत्व केले. त्यावेळी पहिला सामना हा श्रीलंकेबरोबरच खेळवण्यात आला होता. या सामन्यात कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला १६१ धावांनी मोठा पराभव स्विकारावा लागला होता. गांगुलीने १९९९ साली पहिल्यांदा भारताचे नेतृत्व केले होते. यावेळी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यमध्ये सामना झाला होता. या सामन्यात भारताला ४२ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्याचबरोबर पहिल्या तीन सामन्यांमध्ये गांगुलीला फक्त एकच विजय मिळवता आला होता. त्यामुळे कर्णधारांची ही आकडेवारी पाहिली तर त्यामध्ये रोहितच सध्याच्या घडीला आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे रोहितचा हा विक्रम भविष्यात कोणी मोडीत काढेल का, याकडे चाहत्यांचे नक्कीच लक्ष असेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here