महाड: कोकणातील अतिवृष्टीचा मोठा फटका जिल्ह्याला बसला आहे. जिल्ह्यात व पोलादपूरसह तब्बल सहा ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. पावसानं काहीशी उसंत घेतल्यानंतर आता जिल्ह्यात मदत व बचावकार्याला वेग आला आहे. आतापर्यंत दोन ठिकाणी दरडीच्या ढिगाऱ्यांखालून ४४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ही माहिती दिली. दरड कोसळून जखमी झालेल्या ३५ जणांवर सध्या उपचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. एका ठिकाणी बचावकार्य अजूनही सुरूच असून किमान ५० जण ढिगाऱ्याखाली असण्याची भीती घटनास्थळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here