वाचा: वाचा:
कर्नाटकातील गुलबर्गा येथील एका जाहीर सभेत वारिस पठाण यांनी हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलं होतं. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) निघणाऱ्या मोर्चांचा संदर्भ त्यांच्या वक्तव्याला होता. ‘स्वातंत्र्य मागून मिळणार नाही. हिसकावून घ्यावं लागेल. त्यासाठी आपल्याला एकजून राहावं लागेल. आम्ही १५ कोटी असलो तरी १०० कोटींवर भारी आहोत,’ असं पठाण म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून देशभर गदारोळ उठला. मुंबईतील भायखळा मतदारसंघाचे माजी आमदार असलेल्या पठाण यांच्या विरोधात महाराष्ट्रभर निदर्शनं झाली. त्यांच्याविरुद्ध पोलीस तक्रारीही करण्यात आल्या. परिस्थिती चिघळत असल्याचं पाहून पठाण यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं. मात्र, त्यानंतरही त्यांच्यावर टीका सुरूच आहे.
‘पठाण यांनी माफी मागायला हवी होती. तसं झालं असतं तर बरं झालं असतं. ते औरंगजेबाचे वारिस झाले आहेत. पण, त्यांना १०० मावळेही अडचणीत आणतील. जनता त्यांना माफ करणार नाही,’ असं मुनगंटीवार म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times