सिंह देव यांच्या म्हणण्यानुसार, राज्यांकडून केंद्राला ऑक्सिजनअभावी झालेल्या मृत्यूंची आकडेवारी दिली गेली नाही याचं कारण म्हणजे केंद्राकडून राज्याला ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेल्या मृत्यूंची माहिती कधी मागितलीच नाही. छत्तीसगडमध्येही आतापर्यंत ऑक्सिजनअभावी झालेल्या मृत्यांचा कोणताही रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचं सिंह देव यांनी म्हटलंय.
पुन्हा होणार
सोबतच, छत्तीसगड सरकारकडून राज्यात करोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान झालेल्या मृत्यूंचं पुन्हा एकदा ऑडिट करण्यात येईल. यामध्ये झाले अथवा नाही हे समोर येऊ शकेल, असंही सिंह देव यांनी म्हटलंय.
आम्ही अगोदरपासूनच कोविड १९ संबंधित मृत्यूंचं ऑडिट करत आहोत. रुग्णालयात किंवा रुग्णालयाबाहेर एखादा मृत्यू ऑक्सिजनअभावी झाला असेल तर ऑडिट दरम्यान तो ध्यानात घेतलं जाईल, असं छत्तीसगडच्या आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
देशात ऑक्सिजनअभावी झालेल्या मृत्यूंविषयी केंद्रानं राज्यांकडून आपल्याला एकही मृत्यू ऑक्सिजनअभावी झाल्याचं सांगण्यात आलेलं नाही असं म्हटलं. परंतु, त्यांनी राज्यांना या संदर्भात कधी विचारलंच नाही तर आम्ही त्यांना सांगणार कसं? असा प्रश्नही छत्तीसगडच्या आरोग्यमंत्र्यांनी केंद्राला विचारलाय.
एकही मृत्यू ऑक्सिजनअभावी नाही : केंद्राचं म्हणणं
‘ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशात किती रुग्णांनी प्राण गमावले?’ या राज्यसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना ‘देशात करोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान एकही मृत्यू ऑक्सिजनअभावी झालेला नाही’ असं उत्तर केंद्राकडून देण्यात आलं होतं. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. यांनी राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांनी दिलेल्या अहवालांचा हवाला देत दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली होती. उल्लेखनीय म्हणजे, हे उत्तर देतानाच आपल्याकडे माहिती उपलब्ध नसल्याचं किंवा राज्यांकडून या संदर्भात माहिती मागवणार असल्याचा उल्लेख भारती पवार यांच्या उत्तरात नव्हता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times