माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठीचे मतदान केल्यानंतर ते बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी परस्पर भिन्न मतं व्यक्त केली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद असून सरकारमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्याकडं लक्ष वेधलं असता पवार म्हणाले, सरकारमध्ये फूट पडणार नाही. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेतून समविचाराने आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र आली आहे. आम्ही सर्वच मुख्यमंत्र्यांसोबत आहोत. काही विषयांवर मतभेद असू शकतात. मात्र, महाविकास आघाडी अभेद्य आहे.’
वाचा:
‘एनआरसी व एनपीआरच्या संदर्भात राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी जी भूमिका मांडली आहे, तीच भूमिका आम्हा सर्वांची आहे. पक्षाचे सर्वोच्च नेते या नात्याने शरद पवारांनी जे मत मांडले आहे, तेच पक्षाचे व आम्हा सर्वांचेही मत आहे, असं अजित पवार म्हणाले.
सोमवारपासून राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. असून ६ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. माळेगाव कारखान्याच्या बाबतीत सूज्ञ सभासद त्यांच्या प्रपंचाच विचार करून मतदानाच्या माध्यमातून योग्य निर्णय घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times