रत्नागिरी : कोकणात झालेल्या प्रचंड पावसामुळे खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, लांजा, रत्नागिरी आदी भागांना मोठा दणका बसला आहे. गुरुवारची रात्र शेकडो चिपळूणकरांनी भयावह अंधार, सर्वत्र पसरलेला पूर आणि मदतीसाठी आकांत अशा परिस्थितीत काढल्यानंतर, शुक्रवारी आणि आज शनिवारी सकाळपासून बचावकार्याला वेग आला आहे. एनडीआरएफ (National Disaster Response Force) च्या पथकाने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण या पूरग्रस्त भागात बचाव आणि मदतकार्य राबवलं आहे.

याप्रमाणे आता कोकणातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बरेच सर्वसामान्य लोक सरसावले असल्याचे समोर आले आहे. यासाठी काही मदतीचे नंबर आणि मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. आज सकाळी चिपळूण इथे जर कोणाच्या घरात लहान बाळ असेल आणि दुधाची गरज असेल यासाठी देखील काही नंबर सोशल माध्यमांवर व्हायरल करण्यात आले आहे. यासाठी खालील नंबरवर संपर्क करा. आतिफ फकीर – ७०२८५४२४४४, रेहान वणू – ७८८७६४०००९, अब्बास केळकर – ७६२०७३८८५९.

इतकंच नाहीतर नागरिकांकडून गाड्यांचे नंबर प्लेटही व्हायरल करण्यात आले असून यामध्ये खाण्याच्या वस्तू आणि जीवनावश्यक वस्तूंची सोय करण्यात आल्याची माहिती आहे. यासाठी ‘MH०४BG३६२५ – टेम्पो ७०९’ ही गाडी आहे. कोणाला खाण्यासाठी किंवा राहण्याची सेवा हवी असेल तरीदेखील मदतीसाठी फोन करावे असं सामान्य नागरिकांकडून आवाहन करण्यात येत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर राहण्याची मोफत सोय करण्यात आली असून यासाठी दीपेश सागवेकर ९०९६११४६४१ काबर फोन करण्याचा आव्हान करण्यात आला आहे. खेड ते चिपळूण या दरम्यान अडकलेल्या लोकांना मदत म्हणून मुंबई-गोवा हायवेवर मालशे कॉम्प्लेक्स इथं मॅरेज हॉलमध्ये लोकांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे.

यासाठीदेखील काही मोबाईल नंबर वायरल करण्यात आले आहेत. मुसळधार पावसाने कोकणाला अक्षरशः झोडपून काढले आहे. या परिस्थितीत कोणी मुंबई-गोवा महामार्गावर अडकलं असल्यास ८४४६८५५८६८, ८६२६००६८२६, ८९२८८०३११९ या नंबरवर संपर्क करा.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here