अतिवृष्टी, पूर व दरडी कोसळण्याच्या घटनांमुळं रायगड जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री हे येथील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी महाडला रवाना झाले आहेत.

लाइव्ह अपडेट्स:

  • जोरदार पाऊस पडत असताना मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी. मदतकार्याचीही घेतली माहिती
  • सरकारकडून ग्रामस्थांना सर्व मदत केली जाईल; मुख्यमंत्र्यांचं ग्रामस्थांना आश्वासन
  • नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे देखील उपस्थित
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तळीये गावात पोहोचले
  • एनडीआरएफच्या मदतीनं तिथं बचाव व मदतकार्य सुरू आहे
  • तळीये गावात दरड कोसळून ४९ जणांचा मृत्यू झाला आहे.
  • महाड येथील एमआयडीसी हेलिपॅड येथे पोहोचून तिथून ते वाहनानं तळीये गावात जाणार
  • पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाडला रवाना

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here