ICSE Results 2021: इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स () अर्थात आयसीएसई (ICSE) बोर्डाचे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. दहावीची उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.९८ तर बारावीची उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.७६ आहे. या दोन्ही परीक्षा यंदा करोनामुळे रद्द झाल्या होत्या. विद्यार्थ्यांना विशिष्ट सूत्र आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण देण्यात आले आहेत.

आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेसाठी देशभरातून तसेच परदेशातून एकूण २,१९,४९९ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता तर बारावीच्या परीक्षेसाठी ९४,०११ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. दहावीत ९९.९८ टक्के तर बारावीत ९९.७६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

महाराष्ट्राचा दहावीचा निकाल १०० टक्के!

राज्यातील आयसीएसई बोर्डाचे दहावीचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीचा निकाल १०० टक्के तर बारावीचा निकाल ९९.९४ टक्के लागला आहे. राज्यात एकूण २४,३५९ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी २४,३५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बारावी परीक्षेसाठी ३,४२७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ३,४२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

स्टेप बाय स्टेप कसा पाहाल निकाल –
– काउन्सिलच्या www.cisce.org किंवा www.results.cisce.org या संकेतस्थळावर जा.
– होमपेजवर ‘Results 2021’ या लिंकवर क्लिक करा.
– आता दहावी किंवा बारावी यापैकी पर्याय निवडा
– आता विद्यार्थ्यांनी त्यांचा युनिक आयडी, इंडेक्स नंबर आणि कॅपचा आदी माहिती भरून लॉगइन करावे.
– निकाल पाहण्याच्या आणि प्रिंट आऊट काढण्यासंदर्भातील सूचना वेब पेजवर दिलेल्या असतील.

एसएमएसद्वारे कसा पाहाल निकाल?

– दहावीचा निकाल पाहण्यासाठी –
आपल्या मोबाइलमध्ये मेसेजच्या इनबॉक्समध्ये जाऊन न्यू मेसेजमध्ये ICSE असं लिहून त्यापुढे आपला सात अंकी युनिक आयडी टाइप करा. आता हा मेसेज -०९२४८०८२८८३ – या क्रमांकावर पाठवा.

– बारावीचा निकाल पाहण्यासाठी –
आपल्या मोबाइलमध्ये मेसेजच्या इनबॉक्समध्ये जाऊन न्यू मेसेजमध्ये ISC असं लिहून त्यापुढे आपला सात अंकी युनिक आयडी टाइप करा. आता हा मेसेज -०९२४८०८२८८३ – या क्रमांकावर पाठवा.

मेरिट लिस्ट नाही
यंदा कोविड-१९ महामारी संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, अपवादात्मक परिस्थितीत निकाल तयार करण्यात आल्याने मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आलेली नाही, असे आयसीएसई बोर्डाने स्पष्ट केले आहे.

कसा तयार झाला निकाल?
इयत्ता दहावीच्या निकालासाठी विद्यार्थ्यांचे इयत्त नववी आणि दहावीचे विविध परीक्षांमधील गुणांची सरासरी, तसेच दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण (प्रोजेक्ट आणि प्रॅक्टिकल परीक्षा) यांच्या आधारे निकाल तयार करण्यात आला.

बारावीचा निकाल तयार करताना विद्यार्थ्यांचे अकरावी आणि बारावीतील विविध परीक्षांमधील गुणांची सरासरी, इयत्ता दहावीतील इंग्रजी आणि बेस्ट चार विषयातील गुणांची सरासरी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण (प्रोजेक्ट आणि प्रॅक्टिकल परीक्षा) यांच्या आधारे निकाल तयार करण्यात आला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here