खेड: अतिवृष्टिमुळे खेड तालुक्यातील पोसरे बौद्धवाडीतील ७ कुटुंबातील १७ ग्रामस्थ आणि २४ जनावरे दरडीखाली गेल्याने मृत्युमुखी पडले तर ७ जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये २ बालकांचाही समावेश आहे. दरड हटविण्याचे काम सुरु आहे. या दुर्घटनेतील ७ जखमींवर उपचार सुरू आहेत. ही माहिती खेड तालुका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. एनडीआरएफ व लष्कराच्या बचाव पथकाने स्थानिकांच्या मदतीने हे येथील मदतकार्य युद्धपातळीवर शनिवारीही सुरु आहे. ४ जणांचे मृतदेह हाती आलेत. ( 4 bodies recovered in posare village in khed taluka)

या दुर्घटनेत रंजना रघुनाथ जाधव वय ५०, रघुनाथ जाधव वय ५५, विकास विष्णु मोहिते वय ३५, संगिता विष्णु मोहिते वय ६९, सुनिल धोंडीराम मोहिते वय ४७, सुनिता धोंडीराम मोहिते वय ४२, आदेश सुनिल मोहिते वय २५, काजेल सुनिल मोहिते वय १९, सुप्रिया सुदेश मोहिते वय २४, विहान सुदेश मोहिते वय ५, धोडीराम देवू मोहिते वय ७१, सविता धोडीराम मोहिते वय ६९, वसंत धोडीराम मोहिते वय ४४, वैशाली वंसत मोहिते वय ४०, प्रती वसंत मोहिते वय ९, सचिन अनिल मोहिते वय २९, सुमित्रा धोडू म्हापदी वय ६९ यांचा मृत्यू झाला आहे.

क्लिक करा आणि वाचा-
जखमींमध्ये अनिल रघुनाथ मोहिते वय ४९, वसंती रघुनाथ मोहिते वय ६८, प्रिती सचिन मोहिते वय २७, सुरेश अनिल मोहिते वय २७, सनी अनिल मोहिते वय २५, सुजेल वसंत मोहिते वय १८, विराज सचिन मोहिते वय ४ यांचा समावेश आहे. जखमींवर खेड कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here