‘ताई आता बस्स कर, फक्त महाराज इंदोरीकर’ असा या गाण्याचा मुखडा आहे. या गाण्यातून इंदोरीकरांच्या कार्याचा आढावा घेण्यात आलाय. इंदोरीकर तरुण पिढीला ज्ञान देताहेत. त्यांच्या कीर्तनामुळं तमाशाला जाणारा तरुण अध्यात्माकडं वळला आहे. इंदोरीकर लोकांपुढं सत्य मांडताहेत, जे तुम्हाला कधीच जमणार नाही, असा टोलाही गाण्यातून तृप्ती देसाई यांना लगावण्यात आलाय. सर्व जनता त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळं त्यांची नाहक बदनामी थांबवा. त्याचा काही उपयोग होणार नाही,’ असंही गाण्यातून फटकारण्यात आलंय.
नेमका काय आहे वाद?
सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी एका कीर्तनात केलं होतं. त्या वक्तव्यामुळं महिलांचा अपमान झाला असून त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा, या मागणीसाठी तृप्ती देसाई यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. अहमदनगर येथे त्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल न झाल्यास त्यांना काळं फासू असा इशारा दिला होता. त्यामुळं तृप्ती देसाईच वादात अडकल्या आहेत. इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अनेक संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. तसंच, टिकटॉक या प्रसिद्ध अॅपवरही तरुणाईनं इंदोरीकर महाराजांना पाठिंबा दिला आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times