सिंधूने इन्स्टाग्रावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सिंधूच्या जुन्या सामन्यांचा काही भाग दाखविण्यात आला आहे. तसेच सिंधूच्या आई-वडिलांनी तिला ऑलिम्पिकमध्ये यश मिळविण्यासाठी तिला शुभेच्छाही दिल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून सिंधूला आनंद झाला आहे. तिने व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे की, ‘तुम्ही प्रत्येक प्रवासामध्ये माझ्यासोबत असता. ही माझी सपोर्ट सिस्टीम आहे, जी मला नेहमीच पुढे जाण्यासाठी प्रयत्न करते, समर्थन करते आणि प्रेरणा देते. तुमची जागा कुणीही घेऊ शकत नाही. मी माझ्या कुटुंबाची खूप आभारी आहे. आणि या प्रेमळ सरप्राईजसाठी ऑलिम्पिक चॅनेलचे खूप धन्यवाद.’
दरम्यान, रिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधू सुवर्णपदकापासून फक्त एक पाऊल दूर होती. सिंधूला यावेळी सहज ड्रॉ मिळाला आहे आणि तिला जे गटामध्ये स्थान देण्यात आले आहे. स्टार बॅडमिंटनपटू असलेल्या सिंधूला सहावे मानांकन मिळाले आहे. याच गटामध्ये हाँगकाँगच्या च्युंग एनगानला स्थान मिळाले आहे. एनगान जागतिक क्रमवारीत 34वी तर पोलिकार्पोवा 58व्या क्रमांकावर आहे. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन खेळात पदक जिंकणारी सिंधू फक्त दुसरी खेळाडू आहे. याआधी सायना नेहवालने 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक पटकावले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times