या ४५ वर्षीय मनोरुग्णावर सायन रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील एका वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. शनिवारी सकाळी त्याने अचानकपणे खिडकीतून बाहेर उडी घेतली. त्यानंतर तो पहिल्या मजल्यावरील रॅम्पवर कोसळला.
क्लिक करा आणि वाचा-
काहीतरी पडल्याचा आवाज झाल्यानंतर सगळे सावध झाले. त्यावेळी कर्तव्यावर असलेले संभाजी मडगे, लक्ष्मण मडगे आणि सिद्धेश तांबडे या सुरक्षारक्षकांनी या मनोरुग्णाला खाली आणले. तो जखमी झाला होता.
क्लिक करा आणि वाचा-
त्यानंतर या रुग्णाला तातडीने अपघात विभागात दाखल करण्यात आले. या मनोरुग्णाने का उडी घेतली याबाबत काहीच समजू शकलेले नाही. त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला का हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, जखमी झालेल्या या मनोरुग्णावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times