तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या पोसरे बौद्धवाडीतील सहा घरांवर दरड कोसळून त्यात कुटुंबासह घरे जमीनदोस्त झाली. घटना घडून चोवीस तास उलटल्यानंतरही एनडीआरफच्या मदतीने मृतदेह बाहेर काढणे अवघड झाले आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी शुक्रवार संध्याकाळपर्यंत चार मृतदेह बाहेर काढले होते. त्यानंतर एनडीआरएफ, पोलिस यंत्रणा तेथे पोहोचल्या. मात्र दरडीखालील मृतदेह हाती लागले नाहीत. शनिवारी दुपारपर्यंत बेपत्ता असलेल्यांचा शोध लागला नसल्याने प्रशासनाने १७ जण बेपत्ता असल्याचे जाहीर केले. दुर्घटनेत आधी बेपत्ता व नंतर मृत म्हणून जाहीर करण्यात आली. ती नावे पुढीलप्रमाणे : रंजना जाधव (५०), रघुनाथ जाधव (५५), विकास मोहिते (३५), संगीता मोहिते (६९), सुनील मोहिते (४७), सुनीता मोहिते (४२), आदेश मोहिते (२५), काजल मोहिते (१९), सुप्रिया मोहिते (२६), विहान मोहिते (५), धोंडीराम मोहिते (७१), सविता मोहिते (६९), वसंत मोहिते (४४), वैशाली मोहिते (४०), प्रीती मोहिते (१), सचिन मोहिते (२९), सुमित्रा म्हापदी (६९). या दुर्घटनेत बचावलेल्या सात जणांना खेड येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times