मुंबई : प्रसिद्ध अभिनेता आणि त्याच्या अतरंगी फॅशन हा कायमच चर्चेचा विषय असतो. कधी अशा एकदम हटके अशा फॅशनमुळे रणवीरचे कौतुक होते तर कधी त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. अर्थात या सगळ्याचा रणवीरवर काहीही परिणाम होत नाही. तो आपल्याच विश्वात रमत असतो… वेगवेगळ्या, हटके अशा फॅशन सहजपणे कॅरी करत असतो आणि त्याचे फोटो तो सोशल मीडियावर शेअरही करत असतो. आता ही रणीवरचे एकदम हटके असे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये रणवीरने GUCCI चा हिरव्या रंगाचा ट्रॅकसूट, हेअर बँड, गळ्यात मोत्यांची माळ आणि डोळ्यांवर मोठा पांढरा गॉगल अशा हटके लूकमध्ये दिसत आहे.

रणवीरने हे फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. त्यानंतर त्याचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून काहीजणांनी त्याचे कौतुक केले आहे तर काहींनी ट्रोल केले आहे.रणवीरच्या या फोटोंवर नेटकऱ्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी कॉमेन्ट केल्या आहेत. एका युझरने लिहिले आहे, ‘सर तुम्ही एवढे विचित्र लूक कसे करतात हो..,’, तर आणखी एका युझरने लिहिले आहे, ‘अरे हा तर लोखंडवालाचा टपोरीच की…’, आणखी एका युझरने लिहिले, ‘ आईशप्पथ! आता मोत्याची माळ गळ्यात…’, आणखी एका युझरने लिहिले, ‘दादा काही दिसतंय का रे तुला?’, ‘अखेर तू मुलांचे कपडे घातलेस तर…’ अशी कॉमेन्ट आणखी एका युझरने केली आहे. अशा विविध पद्धतीने सोशल मीडियावर युझर्सनी रणवीरच्या फोटोंवर कॉमेन्ट केल्या आहेत. अर्थात अशा प्रकारच्या हटके फॅशनवरून रणवीर अनेकदा ट्रोल झाला आहे.

दरम्यान, रणवीर लवकरच ‘८३’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट १९८३ च्या वर्ल्ड कपमध्ये दिसणार आहे. त्यानंतर ‘सर्कस’, ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here