मुंबईः कोकणात बुधवारी आणि गुरुवारी झालेल्या पावसामुळं खेड, महाड, चिपळूण परिसरात भीषण स्थिती निर्माण झाली आहे. महापुरानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुराचं पाणी जर ओसरण्यास सुरुवात झाली असली तरी अद्याप संकट कायम आहे. या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह राज्यातील नेते व मंत्री कोकणच्या दौऱ्यावर आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे () हेदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) संमतीने कोकणच्या दौऱ्यावर निघाले आहेत.

नारायण राणे हे आज सकाळी कोकण दौऱ्यावर निघाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील उपस्थित आहेत. नारायण राणे हे आज तळीये, चिपळूण या परिसराची पाहणी करणार आहेत. तसं ट्वीट राणे यांनी केलं आहे.

वाचाः

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संमतीने मी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासह रायगड जिल्ह्यातील तळीये, रत्नागिरीतील चिपळूण येथील दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी रवाना होत आहोत. असं ट्वीट नारायण राणेंनी केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंही चिपळूणकडे रवाना

यांनी काल तळीये गावाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. तर, आज ते चिपळूणमध्ये आलेल्या महापुराचा आढावा घेणार आहेत. महापुरामुळं किती नुकसान झालं याची पाहणी करणार असून मदतीची घोषणा करणार असल्याची शक्यता आहे. चिपळूणची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातील नुकसानाचा आढावा घेण्यासाठी जाणार आहेत. मुख्यमंत्री चिपळूणच्या दौऱ्यावर असताना नारायण राणे हेदेखील आज चिपळूणसाठी रवाना झाले आहेत.

वाचाः

पूर ओसरल्यानंतर चिखलाचे साम्राज्य

चिपळूण तालुक्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून पूर ओसरल्यानंतर शहरातील बाजारपेठ आणि आसपासच्या भागांत मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याचे चित्र आहे. खेड व चिपळूणमध्ये किमान दहा ते बारा फूट तर काही भागांत त्यापेक्षाही अधिक पाणी साचले होते. शनिवारी सकाळी दहा वाजल्यानंतर खेड, चिपळूणच्या बाजारपेठा पाण्याच्या वेढ्यातून मुक्त झाल्यावर सर्वच ठिकाणी चिखलाचे सम्राज्य पसरले आहे. चार चाकी व दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. जेसीबी, ट्रॅक्टर, पाण्याच्या टँकरच्या मदतीने स्वच्छता करण्याच्या कामाला नगरपालिका, आरोग्य संस्था लागल्या आहेत.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here