धाडू भोयर (६५) हा गुराखी बैल चरायला शनिवारी सायंकाळी जंगलात घेऊन गेला होता. त्यावेळी तेथे असलेल्या वाघाने त्याच्या नरडीचा घोट घेतला. बैल घरी परतले. मात्र धाडू परत न आल्याने घरच्यांसह गावकऱ्यांनी शोधाशोध केली. तेव्हा सुमारे १५० गावकरी जंगलात गेल्यावर त्यांच्या चाहुलीने वाघ पंजा मारून जंगलात पळून गेला.
अंधार झाल्याने गावकरी गावाकडे परतले. पुन्हा रविवारी सकाळी वनविभागानं पथकासह शोधा-शोध करून पोहचल्यावर सावली वनपरिक्षेत्रातील टेकाडी नियतक्षेत्राच्या कक्ष क्रमांक ३०५ मध्ये पहाटे गुराख्याचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आला.
जिल्ह्यातील जंगलालगत गावानजीक वाघ-बिबट्याचे हल्ले होत असल्याने शेतकरी, गावकरी भयभीत झाले आहेत. परिसरात गस्त वाढविण्यात अली असून वनविभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
धाडूचा जीव घेणारा वाघ नरभक्षक असून, त्यापासून गावकऱ्यांना धोका आहे. त्यामुळे या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी टेकाडीवासीयांनी केली जात आहे.सध्या जिल्ह्यात वाघ आणि बिबट्याचे हल्ले वाढले असून हिंसप्राण्याचा एकप्रकाचा दहशत निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times