सुनील लेंडे हा पत्नी छाया हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी शेतात गेल्यानंतर सुनील याने पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडके मारून तिला जखमी केले. यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर पत्नीचा मृतदेह शेतात ठेवून तो घरी आला. पत्नीच्या नातेवाइकाचे निधन झाले असून, ती माहेरी गेली असल्याचे सुनीलने आपल्या आई-वडिलांना सांगितले. त्याच्या मुलांना आई-वडिलांसोबत पत्नीच्या माहेरी पाठवून दिले. त्यानंतर रात्री एक पोते व पेट्रोल नेऊन पत्नीला शेतापासून जवळच अंतरावर जाळून टाकले. त्यानंतर स्वतःहून तो ठाण्यात हजर होऊन पत्नीचा खून केल्याचे सांगितले. सुनील याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर छाया हिचा भाऊ सुनील तरस (खैरी निमगाव, श्रीरामपूर) याच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक आली, अशी माहिती राहाता पोलिसांनी दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times