रायगडः महाड येथील तळीये गावावर दरड कोसळून नागरिकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. आज केंद्रीय मंत्री () यांनी तळीये () गावाची पाहणी केली त्यावेळी केंद्र सरकार व राज्य सरकार वसाहत बांधतील असं अश्वासन दिलं आहे. त्याचबरोबर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ()मिश्किल टिप्पणीही केली आहे.

नारायण राणे यांनी आज सकाळी देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांच्यासोबत तळीये गावचा पाहणी दौरा केला. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना राज्य सरकारसोबत तुमचं काही बोलणं झालं का?, असा सवाल केला. त्यावर नारायण राणेंनी खोचक टिप्पणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.

नारायण राणे यावेळी म्हणाले की, कोणतं सरकार? महाराष्ट्र सरकारचे लोकं भेटत नाही, बोलत नाहीत. आता कुठे डिस्चार्ज झालाय घरातून आता फिरत आहेत, अशी टीका राणेंनी केली आहे.तसंच, केंद्र सरकारकडून आधीच मदत जाहीर केली आहे. पंतप्रधानांनी मला पाहणीसाठी पाठवलं आहे. त्यांनी मला पाहणी करुन अहवाल देण्याचं सांगितलं आहे. सध्या तरी मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. त्याचबरोबर त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम केलं जात आहे, असंही राणेंनी म्हटलं आहे.

वाचाः

दुर्घटनाग्रस्तांना केंद्र आणि राज्य सरकारकडून मदत दिली जात आहे. त्या पलीकडे मदत होणार नाही असं नाहीये. दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गंत पक्की घरं देण्याची योजना आहे, असं आश्वासन नारायण राणेंनी दिलं आहे. तसंच, एकच गोष्ट आम्हाला परत आणता येणार नाही ते म्हणजे मृत पावलेल्या लोकांना. पण जी लोक आहेत त्यांना मात्र आम्ही दिलासा देऊ शकतो, याची आम्हाला खात्री आहे,’ असं म्हणत दुर्घटनाग्रस्तांना राणेंनी धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

वाचाः

वाचाः

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here