मुंबई– बॉलिवूड अभिनेत्री यांच्या ‘सच कहू तो’ या आत्मकथा असलेल्या पुस्तकाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली. त्यांच्या आयुष्यात घडलेली प्रत्येक गोष्ट नीना यांनी त्या पुस्तकात लिहिली आहे. नीना यांची मुलगी हिलादेखील तिच्या आईच्या पुस्तकातून अशा काही गोष्टी कळाल्या ज्यांचा उल्लेख नीना यांनी यापूर्वी कधीही केला नव्हता. मुख्य म्हणजे त्या गोष्टी मसाबाशी संबंधित होत्या. नुकतंच मसाबाने चाहत्यांसोबत एक प्रश्नउत्तराचं सेशन आयोजित केलं होतं. या सेशनमध्ये चाहत्यानेही मसाबाला तिच्या आईच्या पुस्तकाशी संबंधित प्रश्न विचारला. परंतु, मसाबाने दिलेल्या उत्तराने सगळेच चकित झाले.

मसाबाने आयोजित केलेल्या सेशनमध्ये युझरने विचारलं, ‘नीना यांच्या पुस्तकातील अशी कोणती गोष्ट आहे जी पुस्तकात तर आहे परंतु, तुम्हाला त्याबद्दल माहीत नव्हतं?’ युझरच्या या प्रश्नावर उत्तर देताना मसाबाने लिहिलं, ‘मला माहित नव्हतं की माझ्या जन्माच्या वेळेस आईकडे पैसे नव्हते. मी एक सी-सेक्शन मुलगी आहे. हे हृदय पिळवटून टाकणारं आहे.’ मसाबाने नीना यांच्या पुस्तकातील काही ओळी शेअर करत लिहिलं, ‘जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा आईकडे बँकेत फक्त दोन हजार रुपये होते. तेव्हा सी-सेक्शनने बाळाला जन्म द्यायला जवळपास १२ हजार रुपयांचा खर्च यायचा.’

नीना यांची प्रेरणा घेत मसाबाने लिहिलं, ‘मी आईचं पुस्तक वाचलं आणि त्यातून खूप काही शिकले. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवशी खूप मेहनत करते. त्याचं कारण म्हणजे माझी आई. मला तिने अनेक संकटांचा सामना करून या जगात आणलं. त्यामुळे मला तिला खूप खूप आनंद द्यायचा आहे.’ नीना यांनी त्यांच्या पुस्तकात मसाबाच्या जन्माच्या वेळच्या घटना लिहिल्या आहेत. मसाबा ही वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू विव रिचर्ड्स यांची मुलगी आहे. अभिनेते सतीश कौशिक यांनी नीना यांना गरोदर असताना त्यांच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव देखील दिला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here