नवी दिल्ली : भारताचा अनुभवी स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमारबाबत आता एक मोठा खुलासा समोर आला आहे. कारण भुवनेश्वर कुमारला श्रीलंकेतील दौऱ्यानंतर इंग्लंडमध्ये खेळण्यासाठी पाठवण्यात येणार होते. पण भुवनेश्वरबाबत आता एक मोठा खुलासा समोर आला असून त्याला इंग्लंडमध्ये कसोटी सामने खेळायला पाठवण्यात येणार नाही. त्याचबरोबर भुवनेश्वर कधीपर्यंत कसोटी सामने खेळू शकत नाही, याबाबत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ” भुवनेश्वर इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार, अशी चर्चा सुरु होती. पण भुवनेश्वरला तातडीने इंग्लंडला पाठवण्यात येणार नाही. कारण प्रत्येक खेळाडूचे काम ठरवून दिलेले आहे. भुवनेश्वर हा गेले काही महिने कसोटी क्रिकेट खेळला नाही. त्यााचबरोबर जोपर्यंत ट्वेन्टी-२० विश्वचषक होत नाही, तोपर्यंत त्याला कसोटी क्रिकेटपासून थोडं लांब ठेवण्यात येणार आहे. कारण भुवनेश्वरने आतापर्यंत ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी त्याला खास राखून ठेवण्याता निर्णय घेण्यात आला आहे.”

काही दिवसांपूर्वी भुवनेश्वर कुमार हा कसोटी सामने खेळण्याच इच्छूक नसल्याची जोरदार चर्चा सुरु होती. कारण बऱ्याच कालावधीपासून भुवनेश्वर हा कसोट क्रिकेट खेळलेला नाही. त्याचबरोबर त्याला गेल्यावर्षी दुखापतही झाली होती. त्यामुळे त्याच्यावर जास्त ताण न देण्याचा निर्णय भारतीय संघाने घेतल्याचे समजते आहे. कारण भारतासाठी ट्वेन्टी-२० विश्वचषक ही फार महत्वाची स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी त्याला राखून ठेवण्यात आले आहे. जर घाईघाईत त्याला इंग्लंडला पाठवले आणि त्याला दुखापत झाली तर तो कदाचित ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळू शकणार नाही. कारण इंग्लंडच्या दौऱ्यानंतर आयपीएल खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर ट्वेन्टी-२० विश्वचषक होणार आहे. त्यामुळे आता जास्त काळ विश्वचषकासाठी राहीलेला नाही. त्यामुळे विश्वचषकात खेळण्यासाठी भुवनेश्वरला इंग्लंडमध्ये पाठवण्यात येण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या दौऱ्यानंतर भुवनेश्वर आयपीएलची तयारी करेल आणि त्यानंतर तो विश्वचषकासाठी सज्ज होणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here