: मोठ्या भावाने लहान भावाची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात घडली आहे. क्षुल्लक कारणावरून दोन भावांमध्ये भांडण झालं आणि सुरज देवगडे या मोठ्या भावाने लहान भाऊ धीरज देवगडे याचा गळा दाबून त्याला ठार केले. याबाबत राजुरा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत असून राजुरा शहरही गुन्हेगारी क्षेत्राकडे वळल्याचे चित्र मागील चार-पाच वर्षांपासून घडलेल्या घटनांवरून पाहण्यास मिळत आहे.

राजुरा तालुक्यात वाढते अवैध धंदे आणि त्यातून होत असलेली स्पर्धा एकमेंकाच्या वरचढ होऊ नये म्हणून विविध प्रकारचे फंडे वापरले जात आहेत. मात्र,आज क्षुल्लक कारणातून दोन भावात भांडण झाले आणि एकाच क्षणात होत्याचं नव्हतं झालं. मोठ्या भावाने थेट गळा दाबून लहान भावाला संपवलं आहे.

धीरज देवगडे याचा मृतदेह एक तास घरातच पडून होता. त्यानंतर त्याला राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. राजुरा शहरात अजय लेनगुरे यांच्या घरी देवगडे कुटुंब भाड्याने राहत होते.

दरम्यान, मृतकाचा मोठा भाऊ सुरज देवागडे याला पोलिसांनी अटक केली असून नेमकं भांडण कोणत्या कारणाने झाले याचा शोध राजुरा पोलिस घेत आहे. या घटनेने राजुरा तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

284 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here