राज्यात आज ५ हजार २१२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण ६० लाख ३५ हजार ०२९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.३३ टक्के एवढे झाले आहे.
सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६८,४६,९८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,६४,९२२ (१३.३७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,१७,३६२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,५०६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोणत्या भागात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्णसंख्या?
राज्यातील करोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी ओसरली असली तरी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही संकट टळलेलं नाही. ताज्या आकडेवारीनुसार ठाण्यात ११ हजार ४९४, पुणे येथे १५ हजार ८०३, सांगली १० हजार ३४७, कोल्हापुरात १२ हजार १३८ करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याखालोखाल मुंबईत ७ हजार ६८१, सातारा ७ हजार ६९९ आणि अहमदनगरमध्ये ५ हजार ९५२ इतके अॅक्टिव्ह करोना रुग्ण आहेत.
दरम्यान, राज्यातील करोनाचे संकट कायम असतानाच महापुरानेही थैमान घातलं आहे. पुरामुळे लोकांच्या दैनंदिन गरजांचाच प्रश्न निर्माण झाला असून या स्थितीत करोनाबाबतचे निर्बंध पाळणे कठीण झाले आहेत. त्यामुळे या परिसरात करोना संसर्ग वाढीचा धोका अधिक असून हा धोका टाळण्यासाठी प्रशासनाला पूरग्रस्त भागात अधिक लक्ष केंद्रित करावं लागणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times