: औरंगाबादहून मुंबईकडे बिअरच्या बाटल्या घेऊन जाणाऱ्या कंटेनरचा मुंबई हायवेवर वैजापूर जवळील करंजगाव येथे झाला. या अपघातात कंटेनरचा एका बाजूचा पत्रा निघाला. पत्रा निघताच, या कंटेनरमध्ये बिअरच्या बाटल्या असल्याचे माहिती होताच आसपासच्या परिसरासह रस्त्यावरून जाणाऱ्यांनी फुकटच्या बिअरच्या बाटल्या लुटून नेल्या.

हायवेवर कंटेनर आणि ट्रकची धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातात ट्रकचे नुकसान झाले. मात्र अपघातग्रस्त कंटेनरमध्ये बिअरच्या बाटल्या होत्या. पोलिस कर्मचारी घटनास्थळावर दाखल होईपर्यंत अनेकांनी कंटेनरमधील बिअरच्या बाटल्या आणि बिअरचे बॉक्स पळवून नेले. ही घटना मुंबई हायवेवरील करंजगाव जवळील हॉटेल ब्ल्यू मून जवळ घडली.

सायंकाळी शेंद्रा एमआयडीसी उदयोग क्षेत्रातून एमएच ४६ बीएफ ०५१२ या कंटेनरमधून बीअर बाटल्या मुंबईच्या कुर्ला भागाकडे जात होते. हा कंटेनर वैजापूरमार्गे जात असताना, करंजगाव जवळ असलेल्या ब्ल्यू मून हॉटेल परिसरात समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. या छोट्या अपघातामुळे बीअर घेऊन जात असलेल्या कंटेनरचा एका भागाचा पत्रा खाली पडला. यामुळे या ट्रकमधील बीअरने भरलेल्या बाटल्यांचा बॉक्स उघडे पडले.

या अपघातामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी काही जण पळाले. त्यांनी वाहतूक सुरळीत करून सदर कंटेनर हा एका बाजूला लावला.

बीअरच्या कंटनेरचा अपघात झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि अनेक जणांनी बिअरच्या बाटल्या ट्रकमधून घेऊन जाण्यास सुरुवात केली. ही घटना सायंकाळी ७. ३५ वाजेच्या दरम्यान घडली. साडेआठ वाजेपर्यंत या ट्रकमधील अनेक बिअरच्या बाटल्या नागरिकांनी पळवून नेल्या.

दरम्यान, या भागात आसपास राहणाऱ्या नागरिकांसह या रस्त्याने प्रवास करणाऱ्या अनेकांनी या ट्रकमधून बिअरच्या बाटल्यांचे बॉक्स पळवून नेले. या घटनेची माहिती वैजापूर पोलिसांना देण्यात आली. पोलिस आल्यानंतर ही लूट थांबली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here