मुंबई: शिवसेनेनं राष्ट्रवादी व काँग्रेसला सोबत घेऊन राज्यात सरकार स्थापल्यानंतर विरोधी बाकांवर बसावं लागलेले माजी मुख्यमंत्री यांनी आज आपले जुने मित्र यांचं जाहीररित्या अभिनंदन केलं. फडणवीस यांच्या या पवित्र्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

वाचा:

राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या सरकारच्या चहापानावर विरोधी पक्ष भाजपनं बहिष्कार घातला. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांनी विरोधी पक्षाची भूमिका मांडली. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर त्यांनी आसूड ओढले. मात्र, उद्धव ठाकरे यांचे दोन गोष्टींसाठी अभिनंदन केले.

वाचा:

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (सीएए) पाठिंबा व एल्गार परिषद प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडं (एनआयए) सोपवण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या निर्णयासंदर्भात ते बोलत होते. या दोन्ही निर्णयासाठी उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन करतो, असं ते म्हणाले. ‘कोरेगाव-भीमा आणि एल्गार हे वेगळं नाही, हेच आतापर्यंतच्या तपासात पुढं आलं आहे. तपासाची व्याप्ती आता वाढली असल्याने तो केंद्र सरकारकडे जाणेच योग्य आहे,’ असंही ते म्हणाले. ‘जनगणनेचा कायदा कठोर आहे. प्रश्नावली ठरविण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे,’ असंही फडणवीस यांनी सांगितलं.

महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतरचं हे दुसरं अधिवेशन आहे. वेगळ्या विचारांचे तीन पक्ष असलेल्या या सरकारमध्ये आपसात काही मुद्द्यावर मतभेद आहेत. या मतभेदांचा फायदा उठवून अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती भाजपनं आखली आहे. एल्गार परिषद व सीएएच्या मुद्द्यावर शिवसेनेनं भाजपला पूरक भूमिका घेतल्यानं भाजपला आयतीच संधी चालून आली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here