म. टा. वृत्तसेवा,
श्रावण महिन्यात नूतन वास्तूमध्ये प्रवेश करण्याचे तालुक्यातील येथील एका तरुण दाम्पत्याचे स्वप्न अर्धवट राहिले. त्याअगोदरच काळाने त्यांच्यावर झडप घातली. केवनाळे येथे कोसळलेल्या दरडीखाली सापडून त्यांचा अंत झाला.

मुंबईत कामास आलेले केवनाळे येथील तरुण सुनील केशव दाभेकर (३०) व त्यांच्या पत्नी शिल्पा यांनी पै पै जमवून लॉकडाउन काळात गावाकडे एकमजली टुमदार घर बांधले होते. या नवीन घरात प्रवेश करण्याची स्वप्ने दाभेकर दाम्पत्य पाहत होते. आईवडील व तीन लहान मुले असा संसार होता. मुलांना मुंबईला ठेवून गावाकडील घराचे कामकाज पाहण्यासाठी ते या दुर्घटनेच्या दोन दिवस आधी गावी आले होते. घराला रंगरंगोटी करायची होती. श्रावण महिन्याआधी घराचे सर्व काम पूर्ण करून श्रावणात गृहप्रवेश करण्याचे निश्चित झाले होते.

सुनील दाभेकर यांचे चुलते आणि गावातील ज्येष्ठ कीर्तनकार गेनूबुवा दाभेकर यांनी सुनील आणि शिल्पा या दाम्पत्याला गुरुवारी रात्री जेवायला बोलावले. यावेळी देवळे गावातील महादेव रामजी कदम हेही उशीर झाल्याने जेवायला थांबले. तेवढ्यात, मोठ्या आवाजासह डोंगर कोसळला. काहींनी गेनूबुवा यांना आवाज देऊन बाहेर पडायला सांगितले. मात्र गेनूबुवा यांच्यासह त्यांची पत्नी इंद्राबाई तसेच पुतण्या सुनील आणि शिल्पा हेही या दरडीखाली सापडून मृत्युमुखी पडले. त्यामुळे क्षणात त्यांची मुले पोरकी झाली.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here