जिल्ह्यातील महापुराचा विळखा सैल होत असला, तरी राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडल्याने महापुराची भीती कायम आहे. चिपळूण, महाड येथील पूराचे पाणी ओसरले असले तरी चिखलाचे साम्राज्य कायम आहे.
रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यामध्ये दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ८९ मृतदेह हाती आले असून अद्याप ३४ नागरिक बेपत्ता आहेत. तर, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.
Live Update
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी करणार
- साताराः महापुराने बाधित झालेल्या लोकांच्या निवारा छावणीस मुख्यमंत्री भेट देणार
- उपमुख्यमंत्री अजित पवार आज सांगली, कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करणार
वाचाः
- कोल्हापूरः पंचगंगा नदीची पाणीपातळीत घट; सकाळी पंचगंगेची पाणीपातळी ४९ फुटांवर
- कोल्हापूरः पुणे ते बेंगळुरू महामार्गावर पाणी कायम; वाहतुकीसाठी महामार्ग बंदच
- अहमदनगर : नगर जिल्ह्यातुन वाहणाऱ्या भीमा नदीच्या पाणी पातळीत घट, सकाळी दौंड पुलाजवळ १८ हजार क्यूसेकचा विसर्ग
वाचाः
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times