बिरमणी येथील घटनेत दोन मृतदेह दरडीखालुन रविवारी २५ जुलै रोजी काढण्यात आले आहेत. दरड हटविण्याचे काम सोमवारीही सुरु आहे. या दुर्घटनेतील ७ जखमींवर खेड कळंबणी उपजिल्हारुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशी माहिती खेड तालुका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. एनडीआरएफ व लष्कराच्या बचाव पथकाने स्थानिकांच्या मदतीने येथील मदतकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत पोसरे बौद्धवाडी येथे ८ जणांचे मृतदेह मिळाले. शनिवारी ४ तर रविवारी दुपार पर्यंत ४ मृतदेह मिळाले होते. आतापर्यंत दोन्ही घटनेत तब्बल १८ जणांचे मृतदेह मिळाले आहेत. आतापर्यंत सापडलेल्या मृतदेहांमध्ये पुढील १८ जणांचा समावेश आहे.
मृतांची नावे पुढीलप्रमाणे…
पोसरेवाडी
१] सुप्रिया सुदेश मोहिते वय २४, २] रघुनाथ गणपत जाधव वय ५५, ३]सुनिल धोंडीराम मोहिते वय ४७, ४]रंजना रघुनाथ जाधव वय ५०, ५] वैशाली वंसत मोहिते वय ४०, ६]काजल सुनिल मोहिते वय १९, ७]सुमित्रा धोडू म्हापदी वय ६९ , ८] सचिन अनिल मोहिते ३१, ९]विकास विष्णु मोहिते ३५, १०]आदेश सुनील मोहिते २५, ११] संगिता विष्णु मोहिते वय ६९, १२]सविता धोडीराम मोहिते वय ६९, १३] सुनीता सुनील मोहीते ४५, १४] धोडीराम देवू मोहिते वय ६९, १५] विहान सुदेश मोहिते वय ५, १६] वसंत धोंडीराम मोहिते ४४, अशी पोसरे बौद्धवाडी येथील मृतांची नावे आहेत.
बिरमणी
बिरमणी येथील १७] जयश्री जयवंतराव मोरे ६५, १८] जयवंत भाऊराव मोरे ७० तर एक प्रती वसंत मोहिते वय ९ या मुलाचे शोधकार्य सुरू आहे. अशी माहिती खेड तालुका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान खेड प्रशासन, एनडीआरएफ व लष्कराच्या बचाव पथकाने स्थानिकांच्या मदतीने हे शोधकार्य सलग तिसऱ्या दिवशीही सोमवारी २६ जुलै रोजी युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती खेड तालुका तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी दिली आहे. घटनास्थळी रविवारी मदत व पूवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार,आमदार रामदासभाई कदम, आमदार योगेश कदम यांनी भेट देऊन मदतीचे आश्वासन दिले व तेथील नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या शोधकार्यावर दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगश कदम लक्ष ठेवून आहेत.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times