आज सोमवारी हाँगकाँगमध्ये बिटकॉइनचा भाव १२.५ टक्क्यांनी वधारला आहे. आज बिटकॉइनचा भाव ३९८५० डॉलर इतका वाढला आहे. याआधी शनिवारी बिटकॉइनचा भाव ३३५०० डॉलर होता. मागील सहा आठवड्यात बिटकॉइनचा हा उच्चांकी स्तर आहे.
गेल्या आठवड्याआधी झालेल्या मोठ्या घसरणीनंतर बिटकॉइनचा भाव ३० हजार डॉलरखाली घसरला होता. याच वर्षी बिटकॉइनने ६४८९५.२२ डॉलरची विक्रमी पातळी गाठली होती. सध्या त्याची किंमत निम्म्यावर आली आहे. मात्र सलग पाच सत्रात त्यात झपाट्याने वाढ झाली असून तो ४०००० डॉलरच्या दिशेने वेगाने कूच करत आहे.
बिटकॉइनंतर महाग असलेल्या इथेरियमचा या डिजिटल करन्सीच्या किमतीत देखील आज मोठी वाढ झाली आहे. इथेरियमचा भाव २३०० डॉलरवर गेला आहे. मागील तीन आठवड्यातील इथेरियमचा हा सर्वाधिक स्तर आहे. इथेरियममध्ये ४.५ टक्के वाढ झाली असून एका इथेरियमचा भाव २३०४ डॉलर झाला आहे. शुक्रवारी इथेरियमचा भाव २०७० डॉलरवर गेला होता. त्याआधी गुरुवारी तो १९८४ डॉलर इतका होता.
वाचा :
आभासी चलनांची क्रेझ वाढण्यास जागतिक पातळीवर मागील आठवडाभरात घडलेल्या घडामोडी कारणीभूत आहेत. टेस्ला कंपनीचे प्रमुख एलन मस्क यांनी भविष्यात क्रिप्टोकरन्सी स्वीकारण्याचे संकेत दिले होते. त्याशिवाय मस्क यांनी स्वतः जवळ क्रिप्टोकरन्सीज असल्याचे जाहीर केले होते. यामुळे क्रिप्टोकरन्सी बाजारपेठेत आश्वासक वातावरण तयार झाले.
कालच रविवारी लंडनमध्ये ट्विटरचे प्रमुख जॅक डोर्सी यांनी सोशल मीडिया इंडस्ट्रीमध्ये भविष्यात क्रिप्टोकरन्सीचे मोठे योगदान असेल, असे म्हटलं होते. त्याचे परिणाम आज दिसून आले. या दोन्ही घडामोडी गुंतवणूकदारांना पुन्हा क्रिप्टोकरन्सीकडे वळण्यासाठी पुरेशा ठरल्या असे ब्रोकर्सचे म्हणणे आहे. गेल्या २४ तासात बिटकॉइनमध्ये १.२ अब्ज कॉइन्सची उलाढाल झाली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times