काबूल: अफगाणिस्तानमध्ये ८५ टक्के भागांवर ताबा मिळवल्याचा दावा करणाऱ्या तालिबानचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा समोर येत आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी गझनीमध्ये ४३ जणांची हत्या केली. यामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांसह सामान्य नागरिकांचाही समावेश आहे. तालिबानच्या दहशतीमुळे सामान्य नागरिकांनी प्राण वाचवण्यासाठी आता काबूलच्या दिशेने धाव घेतली आहे. तालिबानच्या हल्ल्याचा धोका लक्षात घेता अफगाणिस्तान सरकारने अनेक भागांमध्ये रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू केली आहे.

गझनीहून काबूलमध्ये आलेल्या आलेल्या एका वडिलांनी आपली व्यथा मांडताना म्हटले की, माझ्या दोन्ही मुलांना तालिबानने गोळ्या झाडून ठार केले. ही दोन्ही मुले सरकारी कर्मचारीही नव्हते, ना सुरक्षा दलाचे जवान. गझनीमधील सिव्हील सोसायटीच्या कार्यकर्त्या मीना नादेरी यांनी सांगितले की, तालिबानी दहशतवादी मालिस्तान जिल्ह्यात घुसले आणि युद्ध गुन्हा केला. युद्धाशी कोणताही संबंध नसणाऱ्यांनाही त्यांनी ठार केले. तालिबानने सामान्य नागरिकांच्या घरावर हल्ले केले आणि लूटमार केली. अनेक घरांना आगीदेखील लावल्यात.

वाचा:

कंदहारमधून जवळपास २२ हजार कुटुंबानी स्थलांतर केले असल्याचा दावा करण्यात आला आहे. कंदहार हा तालिबानचा बालेकिल्ला होता. आता जवळपास २० वर्षानंतर पुन्हा एकदा कंदहारवर ताबा मिळवण्यासाठी तालिबानचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या कंदहार शहराच्या बाहेरील भागामध्ये भीषण संघर्ष सुरू आहे. पोलिसांच्या बेजबाबदारपणामुळे तालिबान शहराजवळ दाखल झाला असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, सामान्य नागरिकांना ठार केल्याचा दावा तालिबानने फेटाळून लावला आहे.

वाचा:
अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी सत्ता सोडावी असे आवाहन वजा धमकी तालिबानने दिली आहे. गनी यांनी सत्ता सोडल्यानंतर शांतता प्रस्थापित होऊ शकते असे तालिबानने म्हटले. सत्तेवर एकाधिकारशाही नको असल्याचेही तालिबानने म्हटले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here