रायगडः महाड तालुक्यात झालेल्या दरड दुर्घटनेप्रकरणी गेल्या चार दिवसांपासून बचावकार्य हाती घेण्यात आलं आहे. पण आता बचावकार्य थांबवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बचाव कार्यादरम्यान होणारी मृतदेहाची विटंबना आता पाहवत नाही. त्यामुळं बचावकार्य थांबवावे, अशी मागणी तळीये ग्रामस्थांनी केली आहे.

डोंगर काळ म्हणून कोसळला आणि महाड तालुक्यातील अख्खे उद्ध्वस्त झाले. गावातील ३२ घरे दरडीखाली गाडली गेली.आतापर्यंत तळीये दुर्घटनेतील ४९ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर, अद्याप ३६ व्यक्ती ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता आहे. मृत व्यक्तीचे नातेवाईक आणि बेपत्ता लोकांच्या नातेवाईकांसह तळीये गावचे सरपंच आणि स्थानिक नागरिकांनी जिल्हा प्रशासनाना बचाव कार्य थांबवण्याची सूचना केली आहे.

ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल मृतदेह काढत असताना त्यांची विटंबना होतेय. मृतदेहाचे हात- पाय असे अवयव मिळत आहेत. ते आम्हाला पाहवत नाही. या ठिकाणी खूपच खोल चिखल आहे. चार ते सहा फूट खोदल्यानंतर मृतदेह सापडत आहेत, अशा वेळी मृतदेहांची दुरावस्था झालेली असते. म्हणून मृतदेहाची विटंबना होऊ नये, यासाठी शोधमोहिम थांबवण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याविषयी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितलं आहे.

वाचाः
आत्तापर्यंत ४८ ते ७२ तास झाले असले तरी कोणीही जिवंत सापडलेलं नाही. आमच्या कुटुंबातील लोक या दुर्घटनेत मरण पावलेत, असा आक्रोश ग्रामस्थांनी केला आहे. तसंच, जे लोक बेपत्ता आहेत त्यांना मृत घोषित करण्यात यावे आणि त्याच ठिकाणी श्रद्धांजली देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निधी चौधरी यांच्याकडे केली आहे.

वाचाः

इतर दुर्घटनेत १९ ते ३६ तासांनंतर वृद्ध आणि लहान मुलंही ढिगाऱ्याखालून जिवंत सापडल्याची उदाहरण आहेत. त्यामुळं कोणीतरी जिवंत सापडू शकेल, असं मी ग्रामस्थांना समजावून सांगितलं आहे. जोपर्यंत शेवटचा मृतदेह सापडत नाही तोपर्यंत जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरु राहतील, असं निधी चौधरी यांनी म्हटलं होतं. पण त्यानंतरही ग्रामस्थांनी हे बचावकार्य थांबवण्यात यावं, अशी विनंती केली. याची सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली जाईल, त्यानंतरच बचावकार्य थांबवण्यात येईल, असं निधी चौधरी यांनी म्हटलं आहे.

वाचाः

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here