मुंबई: ‘मुंबई आणि महाराष्ट्रानं अनेकांना धनिक केलं आहे. श्रीमंत केलं आहे. श्रीमंतांच्या जागतिक यादीत मुंबईतील अनेक जण आहेत. राज्यातील पुराच्या संकटात त्यांना आता मनाची दिलदारी दाखवावी लागेल,’ अशी अपेक्षा शिवसेनेचे खासदार यांनी व्यक्त केली आहे.

मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पुरानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर राऊत यांनी भाष्य केलं. ‘अतिवृष्टी आणि पुराच्या रूपानं महाराष्ट्रावर मोठं संकट कोसळलं आहे. हे संकट गंभीर आहे. गावंच्या गावं वाहून गेलीत, शेकडो जीव गेले आहेत. संसार उद्ध्वस्त झाले आहेत. लाखो लोक बेघर झालेत. राज्य सरकारनं परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. खचलेल्या मनांना नवी उभारी देणं या परिस्थितीत गरजेचं आहे. मुख्यमंत्री हे स्वत: फिरत असून सर्वांना धीर देत आहेत. पण, राज्य सरकारसोबत इतर हातही पुढं यायला हवेत. महाराष्ट्राला सहस्त्र हातांनी मदत मिळण्याची गरज आहे. केंद्र सरकारनं मदतीचा हात पुढं करणं गरजेचं आहे. आताही ते मदत करताहेत. चांगली मदत करताहेत. पण त्याशिवाय, मुंबई, महाराष्ट्रानं अनेकांना धनिक केलं आहे. श्रीमंत केलं आहे. श्रीमंतांच्या जागतिक यादीत मुंबईतील अनेक जण आहेत. त्यांनी आता मनाची दिलदारी दाखवण्याची गरज आहे,’ असं राऊत म्हणाले.

वाचा:

चिपळूण येथे पूरग्रस्तांशी संवाद साधताना आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांना विचारलं असता ते म्हणाले, ‘भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले हे मी ऐकलेलं नाही. वृत्तपत्रांमधून वाचलं. त्यावर स्वत: भास्कर जाधव बोलतील. पूरग्रस्तांच्या वेदना, आक्रोश आम्ही समजू शकतो. राज्याचे मुख्यमंत्री पाऊस व चिखलाची पर्वा न करता पूरग्रस्तांना धीर देत आहेत. अशावेळी सर्वांनीच संयम राखण्याची गरज आहे.’

काय म्हणाले होते भास्कर जाधव?

उद्धव ठाकरे हे चिपळूणमधील नुकसानीची पाहणी करत असताना एका महिलेनं त्यांच्याकडं मदतीची मागणी केली. ‘मदत केल्याशिवाय जाऊ नका. आमदार, खासदारांचा दोन महिन्यांचा पगार देऊ नका, पण आम्हाला मदत करा, असं ही महिला म्हणाली. त्यावर, तुम्हाला सर्व प्रकारची मदत करू, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं. त्यावेळी तिथं असलेले भास्कर जाधव हेही बोलले. ‘आमदार, खासदारांच्या पगारानं तुमचं नुकसान भरू निघणार नाही. तुझ्या आईला समजाव,’ असं जाधव संबंधित महिलेच्या मुलाला म्हणाले. त्यावरून सध्या गदारोळ सुरू आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here