मुंबई: कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळं मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली आहे. पुरानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व पूरग्रस्त नागरिकांना धीर देण्यासाठी मुख्यमंत्री गेल्या तीन दिवसांपासून दौरे करत आहेत. महाड व चिपळूणनंतर आज ते सातारा दौऱ्यावर जात असून तेथील पूरग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. (CM in Satara)

सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं पाटण तालुक्यात हाहाकार उडाला आहे. आंबेघर इथं दरड कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, मिरगाव इथं दरड कोसळून मोठं नुकसान झालं आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत. महापुरानं बाधित झालेल्या लोकांच्या निवारा छावणीस भेट देऊन मुख्यमंत्री त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.

असा आहे दौरा:

  • मुख्यमंत्री ठाकरे हे सकाळी १०.४५ वाजता पुण्याहून कोयनानगरकडे हेलिकॉप्टरनं रवाना होतील.
  • सर्वप्रथम मुख्यमंत्री दुर्घटनाग्रस्त भागांची हवाई पाहणी करतील. नंतर ११.३० वाजता कोयनानगर हेलिपॅडवर त्यांचं आगमन होईल.
  • पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ते कोयनानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील निवारा स्थळी भेट देतील व पूरग्रस्तांची विचारपूस करतील.
  • दुपारी १२.१५ वाजता कोयनानगर इथं जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली जाईल. त्यानंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषदेला संबोधित करतील.
  • पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री हेलिकॉप्टरनं पुणे विमानतळाकडे रवाना होतील.

आज सांगलीत

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सांगली दौऱ्यावर आहेत. ते दुपारी १२ वाजता पलूसमध्ये जाऊन पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयात ते आढावा बैठक देखील घेणार आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here