नवी दिल्लीः नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे (CAA) विरोधक आणि समर्थकांमध्ये जाफराबाद येथे दगडफेक झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रू धुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. तर खबरदारी म्हणून दोन मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आली आहेत. आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

सीएएविरोधात जाफराबादमध्ये मोठ्या संख्येत महिला आल्या होत्या. तर या सीएएच्या समर्थनात भाजप नेते कपिल मिश्रा यांच्या नेतृत्त्वात मौजपूर चौकात अनेक लोक जमा झाल होते. याच दरम्यान मौजपूरजवळ असलेल्या कबीर नगर मेट्रो स्टेशनजवळ सीएए विरोधक आणि समर्थक भिडले. दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक झाली. यामुळे त्या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. याचं लोण जाफराबादमध्ये पसरलं. तिथेही सीएए समर्थक आणि विरोधकांमध्ये दगडफेक झाली.

कबीर नगर मेट्रो स्टेशनजवळ सीएए समर्थक आणि विरोधकांमध्ये झालेल्या दगडफेकेन परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिकांची धावपळ झाली. दगडफेकीत एक जण जखमी झालाय. त्याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलंय. पोलिसांनी दगडफेक रोखण्याचा प्रयत्न केला. पण परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी जवामावाला पांगवण्यासाठी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या.

तणावग्रस्त भागात पोलिसांचे संचलन

तणावग्रस्त भागात पोलिसांनी संचलन केले. तेथील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. पोलिसांवरही दगडफेक करण्यात आलीय. आवश्यक पोलिस बळ तैनात करण्यात आलंय. आता परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती सहपोलीस आयुक्त आलोक कुमार यांनी दिली.

मौजापूर भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी दोन बाजूंनी दगडफेक झाली होती. जाफराबादमध्ये सीएएविरोधात झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ तिथे आंदोलन सुरू आहे.

दरम्यान, अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील महिला विद्यार्थ्यांनी सीएएविरोधी आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक केली. तसंच जामा मशिदीजवळील ट्रान्सफॉर्मर पेटवण्याचाही प्रयत्न केला गेला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. नुकसानीचा आढावा घेण्यात येतोय, अशी माहिती अलिगढचे जिल्हाधिकारी चंद्रभूषण सिंह यांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here